अकोला – आपल्या रास्त मागण्यांसाठी आरोग्यमित्र कर्मचारी
संघटनेने राज्यव्यापी कामबंद आंदोलन सुरू केले आहे.
अकोल्यातही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आरोग्यमित्रांनी
Related News
सोनं 1 लाख पार करणार? – तज्ज्ञांच्या अंदाजांमधून गुंतवणूकदार संभ्रमात!
जळगाव पोलीस ठाण्यातील दोन हवालदार लाच घेताना अटकेत; गुन्हा दाखल
अहमदाबादमध्ये अपार्टमेंटला आग; धडकी भरवणाऱ्या १८ जणांच्या रेस्क्यूचा थरार
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून राजू शेट्टी आक्रमक
अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर यांच्या घरासमोर प्रहार जनशक्ती पक्षाचं मशाल आंदोलन
बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्तीसाठी अकोटमध्ये ४०० नागरिकांची स्वाक्षरी
Saif Ali Khan Attack Case: 16 हजार पानी आरोपपत्रात गंभीर खुलासे; करीना कपूरचा पोलिसांना सविस्तर जबाब
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राज्य शासनाचा उपक्रम – 14 व 15 एप्रिलला मोफत टूर सर्किट
किन्हीराजा : श्री शिवाजी हायस्कूलला दीड लाखांचे आरोप्लॅन्ट भेट – श्रीकृष्ण सोनुने यांचे योगदान
लाखपुरी येथे महात्मा फुले जयंती उत्साहात साजरी
दहीहंडा येथे शॉर्टसर्किटमुळे किराणा दुकानाला आग; दोन ते अडीच लाखांचे नुकसान
कळंबा खुर्द येथे महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न
आपल्या मागण्यांसाठी धरणे आंदोलनाला सुरुवात केली आहे.
आरोग्यमित्र कर्मचारी अत्यंत तुटपुंज्या पगारात काम करत असल्याने
त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर झाला आहे. याआधी अनेक वेळा शासनाकडे आपल्या
अडचणी मांडूनही कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही.
त्यामुळे संतप्त कर्मचाऱ्यांनी आता आंदोलनाचा मार्ग अवलंबला आहे.
संघटनेच्या वतीने सांगण्यात आले की, जर शासनाने मागण्या मान्य केल्या नाहीत,
तर हे आंदोलन बेमुदत सुरू राहील. शासनाने त्वरित लक्ष घालावे आणि
आरोग्यमित्र कर्मचाऱ्यांच्या वेतन व सेवा शर्ती सुधाराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.
सिद्धार्थ इंगोले, आरोग्यमित्र, अकोला – “आमच्या वेतनात कोणतीही वाढ नाही,
आम्हाला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.
शासनाने आमच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे.”
वर्षा इंगळे, आरोग्यमित्र, अकोला – “आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आम्ही हे आंदोलन सुरू ठेवू.
बेमुदत कामबंद आंदोलन आमच्यासाठी शेवटचा पर्याय आहे.”
Click here for more updates : https://ajinkyabharat.com/vigilance-of-local-women-revealed/