मुंबई : पुढील २४ तासांत अकोला, अमरावती आणि बुलढाणा जिल्ह्यांतील काही भागांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा इशारा राज्य प्रशासनाने दिला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार या तीनही जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसासह विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांची शक्यता आहे. त्यामुळे नदी, नाले आणि ओढ्यांच्या परिसरात जाणे टाळावे. तसेच सखल भागात पाणी साचण्याची शक्यता लक्षात घेऊन नागरिकांनी सतर्क राहावे, असे प्रशासनाने म्हटले आहे.
शेतकऱ्यांनी शेतातील कामे करताना हवामानाचा अंदाज लक्षात घ्यावा. वीज चमकत असताना झाडाखाली किंवा मोकळ्या मैदानात थांबू नये. आवश्यक नसल्यास प्रवास टाळावा आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
Related News
आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास नागरिकांनी जिल्हा प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेशी तातडीने संपर्क साधावा. परिस्थितीवर प्रशासनाकडून सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असून आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
READ ALSO : https://ajinkyabharat.com/big-relief-after-3-days-of-waiting-mumbai-pune-railway-service-restarted/
