अकोला : अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी नगरपरिषदेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांना मोठा राजकीय धक्का बसला आहे. बार्शीटाकळी नगरपरिषदेतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) तसेच चार अपक्ष अशा एकूण १० नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
मुंबईतील ‘नंदनवन’ या शासकीय निवासस्थानी झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात या नगरसेवकांनी शिवसेनेचा झेंडा हाती घेतला. विशेष म्हणजे प्रवेश करणाऱ्या नगरसेवकांमध्ये नऊ मुस्लिम नगरसेवकांचा समावेश असल्याने या घडामोडीची राजकीय वर्तुळात विशेष चर्चा सुरू झाली आहे.
या पक्षप्रवेशासाठी अकोला जिल्हा शिवसेनेचे विशेष प्रभारी ललितभाऊ वानखडे आणि जिल्हाप्रमुख चंद्रशेखर पांडे गुरुजी यांनी पुढाकार घेतला. नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले.
Related News
श्वेता महालेंचा संजय गायकवाडांना पुन्हा टोला; ‘बाप तो बाप रहेगा’वरून वाद पेटला
पुणे पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवारीवरून महायुतीत संघर्ष; राष्ट्रवादीच्या मागणीने नवा ट्विस्ट
PM मोदी अॅक्शन मोडमध्ये! 23-24 सप्टेंबरला महत्त्वाची बैठक; फेरबदलाची चर्चा
शेतकऱ्यांसाठी राज्य सरकार ॲक्शन मोडमध्ये; पालकमंत्र्यांना तातडीने जिल्ह्यात जाण्याच्या सूचना
Disha Salian प्रकरणात ‘नेपाळी कनेक्शन’; संजय राऊतांचा खळबळजनक दावा
तृणमूलचं ‘जोडफूल’ गोठलं, ममता बॅनर्जींची नवी रणनीती; 3 नावं, 3 चिन्हं चर्चेत
शिवसेना, राष्ट्रवादीनंतर आता TMCला झटका; निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव-चिन्ह गोठवलं
चांदीवाल आयोगाचा अहवाल सार्वजनिक करा; रोहित पवारांचे मुख्यमंत्री फडणवीसांना थेट आव्हान
TMCचा ‘फुले-गवत’ चिन्हावरून वाद; ममता बॅनर्जींसमोर आता नवी परीक्षा
एकनाथ शिंदेंचा मोबाइल विमानातच विसरला; पोलिसांची मध्यरात्री एकच धावपळ!
INDIA आघाडीत मोठी फूट? ममता बॅनर्जींची वेगळी चूल; कनिमोळींच्या भेटीने चर्चांना उधाण
या प्रवेशामुळे बार्शीटाकळी नगरपरिषदेतील शिवसेनेची ताकद वाढणार असल्याचे मानले जात आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या राजकीय घडामोडीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात असून, स्थानिक राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या पक्षप्रवेशानंतर बार्शीटाकळीतील राजकारण अधिक चुरशीचे होण्याची चिन्हे असून, आगामी निवडणुकांमध्ये शिवसेना अधिक आक्रमकपणे मैदानात उतरणार असल्याची चर्चा सुरू आहे. दुसरीकडे, विरोधी पक्षांकडूनही संघटनात्मक बांधणीवर भर दिला जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
