कामाच्या ठिकाणी महिलांना सुरक्षित आणि सन्मानजनक वातावरण मिळावे यासाठी लागू करण्यात आलेल्या POSH (Prevention of Sexual Harassment) कायदा 2013 मध्ये आवश्यक सुधारणा करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या संबंधित मंत्र्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत श्रीमती हर्षला गोलवलकर, अॅड. सध्या साबिर्दे, श्रीमती यशोधरा गोडबोले, अॅड. अस्मिता काटे, प्रसन्न धर्माधिकारी आणि अॅड. शैली पंड्या यांच्या टीमने महिला व बाल विकास मंत्री Aditi Tatkare तसेच श्रम मंत्री Akash Fundkar यांची भेट घेत विविध सुधारणा प्रस्ताव सादर केले.

बैठकीदरम्यान POSH कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अनेक महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. सध्या वार्षिक स्वरूपात सादर होणाऱ्या अहवालांऐवजी त्रैमासिक किंवा सहामाही अहवाल सादर करण्याची व्यवस्था असावी, जेणेकरून कायद्याच्या अंमलबजावणीचा नियमित आढावा घेता येईल, अशी मागणी करण्यात आली. तसेच SHe-Box हेल्पलाइन आणि 112 या आपत्कालीन क्रमांकाची माहिती प्रत्येक कार्यालयात स्थानिक भाषेत ठळक फलकांवर प्रदर्शित करावी, जेणेकरून महिलांना तातडीने मदत मिळू शकेल, अशी सूचना मांडण्यात आली.
Related News
रोहित पवार पक्षात एकटे पडले? अखेर मौन सोडत केला मोठा खुलासा; थेट शरद पवारांच्या पत्राचाच दिला दाखला!
हिवाळी अधिवेशनावर शेतकरी आणि शेतमजुरांच्या प्रश्नांसाठी काढण्यात येणाऱ्या मोर्...
Continue reading
सोन्याच्या दरात नोव्हेंबरमध्ये मोठी घसरण! १० ग्रॅममागे तब्बल १४ हजारांची कपात; पुढील १५ दिवस ठरणार निर्णायक, दर आणखी घसरणार की पुन्हा उसळी घेणार?
गेल्या काही महिन्यांपासून सोन्याच...
Continue reading
अकोल्यातील सिद्धिविनायक मंदिरात प्रत्येक संकष्टी चतुर्थीला पोलीस बंदोबस्ताची मागणी; भाविकांच्या सुरक्षेसाठी निलेश देव यांचे निवेदन
सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत पोलिसांची नियुक...
Continue reading
पेपरफुटी करणाऱ्यांची आता खैर नाही! १० कोटींचा दंड अन् १० वर्षांपर्यंत कारावास; राज्य सरकारचा कठोर कायद्याचा प्रस्ताव!
महाराष्ट्रातील नोकरभरती आणि स्पर्धा परीक्षांमधील गैरप्रकारांन...
Continue reading
शरद पवार राजकारणातून निवृत्त होणार नाहीत! सुप्रिया सुळे यांचा स्पष्ट इशारा; निवृत्तीच्या चर्चांवर संताप व्यक्त
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवा...
Continue reading
डिलिमिटेशन विधेयकासाठी खासदारांना १५० कोटींची ऑफर? संजय राऊतांचा खळबळजनक दावा; अमित शाह आणि भाजपवर थेट निशाणा!
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघ पुनर्रचना अर्थात डि...
Continue reading
26/11 च्या भीषण दहशतवादी हल्ल्याने हिरावले बालपण! देविका रोटावनचा थरारक अनुभव ऐकून शाहरुख खान आणि रणवीर सिंह भावूक
26 नोव्हेंबर 2008... मुंबईच्या इतिहासातील काळा दिवस! पाकिस्ताना...
Continue reading
बीडमध्ये बोगस शिक्षक भरती प्रकरणाचा मोठा पर्दाफाश! ७३ शिक्षकांची सेवा समाप्त; आणखी २,२१७ शिक्षकांवर कारवाईची टांगती तलवार
महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडवणारे बोगस शिक्...
Continue reading
गोवंश कत्तलीसाठी खरेदी करणाऱ्यांवर थेट मोक्का लावणार; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा इशारा!
गोशाळांच्या जमिनींची खरेदी-विक्री आता कृषी दराने; अधिकृत गोशाळांना डीपीसीच्या म...
Continue reading
EPFO Rule Change : नोकरदारांसाठी मोठी खुशखबर! आता 90 टक्के PF रक्कम काढता येणार; EPFO च्या नियमांत मोठे बदल, बेरोजगारांनाही दिलासा
देशातील कोट्यवधी नोकरदारांसाठी कर्मचारी भविष्य न...
Continue reading
भाजप आमदार महेश बालदी यांना ३ वर्षांचा सश्रम कारावास; अलिबाग न्यायालयाचा मोठा निर्णय, शिक्षेनंतर लगेच जामीन मंजूर!२०१० मधील मारहाण आणि शिवीगाळ प्रकरणात आमदारासह चा...
Continue reading
शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा! राज्यातील आणखी ६ तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश; एकूण संख्या ३१० वर
राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने मह...
Continue reading
याशिवाय, नवीन कर्मचाऱ्यांना कामावर रुजू झाल्यानंतर सात दिवसांच्या आत POSH कायद्याचे प्रशिक्षण देणे बंधनकारक करण्याचा प्रस्तावही बैठकीत ठेवण्यात आला. कायद्याच्या प्रभावी निरीक्षणासाठी आणि अंमलबजावणीवर देखरेख ठेवण्यासाठी स्वतंत्र राज्य POSH निरीक्षण प्राधिकरण स्थापन करण्याची मागणीही करण्यात आली.
मंत्र्यांनी टीमने मांडलेल्या सर्व मुद्द्यांचे स्वागत करत त्यावर सकारात्मक भूमिका घेतली. लवकरच यासंदर्भात शासकीय ठराव (GR) जारी करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले. तसेच इतर प्रस्तावित सुधारणा अंमलात आणण्यासाठीही शासन सकारात्मक विचार करणार असल्याचे मंत्र्यांनी स्पष्ट केले.
शासकीय ठराव प्रसिद्ध झाल्यानंतर POSH कायद्याच्या सुधारित अंमलबजावणीसाठी पुढील आवश्यक कार्यवाही करण्यात येणार आहे. महिला कर्मचाऱ्यांच्या हक्कांचे संरक्षण, कामाच्या ठिकाणी सुरक्षितता आणि न्याय मिळवून देण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याची भावना बैठकीनंतर व्यक्त करण्यात आली.
read also : https://ajinkyabharat.com/shocking-murder-case-in-yavatmal-lagnala-na-bolavalyachya-ragatoon/