खामगाव, प्रतिनिधी – खामगाव रेल्वे धक्का परिसरातून भारतीय अन्न महामंडळ (एफसीआय)च्या गोदामात तसेच सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत रेशन दुकानदारांकडे थेट होणाऱ्या गव्हाच्या वाहतुकीबाबत गंभीर आरोप समोर आले आहेत. रेल्वे रॅकमधून येणारा गहू भिजलेला, कुजलेला आणि निकृष्ट दर्जाचा असल्याचा दावा करत संबंधित धान्याचे वितरण तत्काळ थांबवून संयुक्त तपासणी (जॉईंट सॅम्पलिंग) करण्याची मागणी करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खामगाव रेल्वे धक्क्यावर एफसीआयच्या माध्यमातून शासकीय धान्याची साठवणूक आणि पुढील वितरण प्रक्रिया पार पडते. या कामासाठी सिल्वर रोड लाईन्स या ट्रान्सपोर्ट कंपनीला उपजिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडून एफसीआय गोदाम तसेच रेशन दुकानदारांपर्यंत धान्य वाहतुकीची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, या प्रक्रियेत गंभीर अनियमितता होत असल्याचा आरोप स्थानिक तक्रारदारांनी केला आहे.
तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, रेल्वे रॅकमधून उतरवला जाणारा काही गहू पूर्णपणे ओलसर, खराब झालेला तसेच कुजलेल्या अवस्थेत असतो. असा धान्य मानवी सेवनासाठी अयोग्य असून तो थेट रेशन दुकानांपर्यंत पोहोचल्यास नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो, असा इशाराही देण्यात आला आहे.
Related News
फडणवीस मोदींचे वारसदार? उपपंतप्रधानपदाबाबत संघात चर्चा असल्याचा संजय राऊतांचा दावा; तीन महिन्यांत मोठ्या राजकीय घडामोडींचे संकेत
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
Continue reading
जंतरमंतरवर जाण्यापासून रोखलं तर काय? CJPचा ‘प्लान बी’ तयार; जिथे अडवतील तिथेच आंदोलन
कथित निवडणूक घोटाळ्याच्या मुद्द्यावरून कॉकरोच जनता पार्टी (CJP) आक्रमक झाली असून, मुख्य निवडणू...
Continue reading
१० ते १२ महिलांच्या तक्रारींचा दावा; श्वेता महालेंचा सूचक इशारा, संजय गायकवाडांच्या अडचणी वाढणार?
भाजप आमदार श्वेता महाले आणि शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्यातील वाद आता अधि...
Continue reading
दिनो मोरियाला अटक होणार? मिठी नदी गाळ उपसा प्रकरणात EOWची चौकशी; नेमकं प्रकरण काय?
दिनो मोरियाची EOWकडून चौकशी : अभिनेता दिनो मोरिया पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मुंबईतील मिठी नदीच...
Continue reading
मोठी बातमी! शरद पवार थेट मुख्यमंत्र्यांना भेटणार; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्या मांडणार
महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्व...
Continue reading
No UPI Day Today 2 October : आज बाजारात जाताना खिशात कॅश ठेवा; व्यापाऱ्यांचा ‘नो UPI डे’, अतिरिक्त शुल्काच्या प्रस्तावाला विरोध
No UPI Day Today 2 October : देशभरातील व्यापारी सं...
Continue reading
‘तुम्ही साले… कसले बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार?’; प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावरून संजय राऊतांचा संताप
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे ठाण्यातील विभागप्रमुख प्रदीप ऊर...
Continue reading
अवैध सावकारीच्या तावडीतून शेतकऱ्याची २ हेक्टर २ आर जमीन मुक्त
जिल्हा निबंधक गीतेशचंद्र साबळे यांचा महत्त्वपूर्ण आदेश; पाथर्डी येथील मूळ शेतमालक रामदास गायगोळ यांना जमीन परत
अवैध ...
Continue reading
मुंबईतील आंदोलनापूर्वीच अभिजीत दिपकेंना मोठा दिलासा; CJP कार्यकर्त्यांवरील कारवाई झाल्यास मोफत कायदेशीर लढ्याची घोषणा
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या माग...
Continue reading
सहकाऱ्यांना नोटीस येताच मनोज जरांगे पाटील आक्रमक; ‘मेलो तरी शरण जाणार नाही’
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांच्या सहकाऱ्यांना नोटीस बजावण्यात आल्यान...
Continue reading
सिंधुदुर्गात 900 कोटींच्या जमीन व्यवहाराचा आरोप; संजय राऊतांचा खळबळजनक दावा, मंत्र्यांच्या भूमिकेवरही सवाल
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जमीन व्यवहारावरून महाराष्ट्राच्या रा...
Continue reading
12 ऑक्टोबरपर्यंत शेतकऱ्यांना मदत द्या, अन्यथा समृद्धी महामार्ग रोखणार; रोहित पवारांचा सरकारला इशारा
रोहित पवार : राज्य सरकारने महाराष्ट्रातील काही भागांत दुष्काळ जाहीर केला असला,...
Continue reading
या पार्श्वभूमीवर संबंधित गव्हाची कोणतीही तपासणी न करता थेट गोदामात किंवा रेशन दुकानदारांकडे पाठविण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. एफसीआयचे रेल्वे प्रतिनिधी, वखार विभागाचे अधिकारी तसेच संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संयुक्त सॅम्पलिंग करूनच धान्याची गुणवत्ता निश्चित करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
सध्याची प्रक्रिया नियमबाह्य असल्याचे नमूद करत तातडीने निकृष्ट गव्हाचे वितरण थांबवण्याची मागणीही करण्यात आली आहे. तसेच गहू खाण्यास योग्य आहे की नाही, याची अधिकृत प्रयोगशाळा तपासणी करूनच पुढील वाहतूक व वितरण करावे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
या प्रकरणासंदर्भातील फोटो, व्हिडीओ आणि निवेदन संबंधित विभागांना पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, या गंभीर आरोपांवर प्रशासन कोणती भूमिका घेते आणि तपासणी करून दोषींवर कारवाई होते का, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.
read also : https://ajinkyabharat.com/akola-land-development-mobdalyavarun-shetkaryacha-attempted-self-immolation-in-front-of-the-district-magistrates-office-police-arrested/