अकोला : अकोला तालुक्यातील नेर धामणा येथील शेतकऱ्याने भूसंपादन मोबदल्यावरून असमाधान व्यक्त करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी घडली. या वेळी उपस्थित पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करून संबंधित शेतकऱ्याला ताब्यात घेतले आणि पुढील अनर्थ टाळला.
नेर धामणा बॅरेज प्रकल्पासाठी अकोला पाटबंधारे विभागामार्फत ८० आर शेतजमीन भूसंपादित करण्यात आली आहे. या जमिनीचा मोबदला शासनाने २० लाख ६२ हजार रुपये निश्चित केला असल्याचे निवेदनात नमूद आहे. मात्र सद्यस्थितीतील बाजारभावानुसार या जमिनीची किंमत सुमारे ४१ लाख २४ हजार रुपये असल्याचा दावा संबंधित शेतकऱ्याचा आहे. त्यामुळे शासनाकडून मिळणारा मोबदला अन्यायकारक असल्याचे त्याचे म्हणणे आहे.
या संदर्भात शेतकऱ्याने वारंवार पत्रव्यवहार करून तसेच अधिकाऱ्यांसोबत बैठका घेऊन न्याय मिळवण्याचा प्रयत्न केला. स्थानिक लोकप्रतिनिधींसोबतही चर्चा करण्यात आल्या, मात्र त्यातून समाधानकारक तोडगा निघाला नाही, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
Related News
फडणवीस मोदींचे वारसदार? उपपंतप्रधानपदाबाबत संघात चर्चा असल्याचा राऊतांचा दावा
10ऑक्टोबरला दिल्ली धडकणार CJP; जंतरमंतरसाठी ‘प्लान बी’ रेडी
10 ते 12 महिलांच्या तक्रारी; श्वेता महालेंचा संजय गायकवाडांना सूचक इशारा!
दिनो मोरियाची EOWकडून चौकशी; मिठी नदी गाळ उपसा प्रकरणात मोठी अपडेट
मोठी बातमी! शरद पवार मुख्यमंत्र्यांची भेट घेणार; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्या मांडणार
No UPI Day Today 2 October : व्यापाऱ्यांचा डिजिटल व्यवहारांना विरोध, बाजारात जाताना कॅश ठेवा
‘कसले बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार?’; प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावरून संजय राऊत आक्रमक
अवैध सावकारीच्या तावडीतून शेतकऱ्याची 2 हेक्टर 2 आर जमीन मुक्त; जिल्हा निबंधकांचा आदेश
मुंबईतील आंदोलनापूर्वीच अभिजीत दिपकेंना मोठा दिलासा; CJP कार्यकर्त्यांसाठी वकिलाची मोठी घोषणा
मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा; ‘कितीही त्रास दिला तरी शरण येणार नाही’
सिंधुदुर्गात 900 कोटींच्या जमीन व्यवहाराचा आरोप; संजय राऊतांचा खळबळजनक दावा
12 ऑक्टोबरपर्यंत मदत द्या, अन्यथा समृद्धी महामार्ग रोखणार; रोहित पवारांचा सरकारला इशारा
अखेर संतप्त झालेल्या शेतकऱ्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत त्याला ताब्यात घेतले. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पुढील तपास प्रशासनाकडून सुरू आहे.
