कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण..!

इराण

इराण-इस्रायलच्या संघर्षांदरम्यान भडकलेले कच्च्या तेलाचे भाव

पुन्हा एकदा घसरले आहेत. क्रूड ऑईल प्रति बॅरल ७५ डॉलरच्या

खाली आले आहे. दिवाळी काही दिवसांनर येऊन ठेपली आहे.

Related News

दुसरीकडे महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकाही आहेत. या सर्व

पार्श्वभूमीवर सणासुदीत पेट्रोल-डिझेलच्या किमतीत कपात होण्याची

अपेक्षा सर्वसामान्यांना होती. मात्र, आता आचारसंहिता लागू झाल्याने

ही आशा धुसर झाल्याचे दिसत आहे. OIL ब्रेंट क्रूड ऑइलची किंमत

४.२९ टक्क्यांच्या घसरणीसह प्रति बॅरल ७४.१४ डॉलर वर व्यापार

करत आहे. तर डब्लूटीआय क्रूड ४.५४ टक्क्यांच्या घसरणीसह ७०.४८

डॉलर प्रति बॅरलवर व्यवहार करत आहे. कच्च्या तेलाच्या किमतीतील

या घसरणीचा सर्वात मोठा दिलासा तेल विपणन कंपन्या इंडियन ऑइल,

बीपीसीएल आणि हिंदुस्थान पेट्रोलियम यांना मिळाला आहे. त्यामुळे

मंगळवारी (ता.१५) ऑक्टोबरच्या ट्रेडिंग सत्रात तिन्ही कंपन्यांच्या शेअर्स

मध्ये मोठी वाढ झाली आहे. तिन्ही तेल विपणन कंपन्यांच्या शेअर्समध्ये

झालेली वाढ ही केवळ कच्च्या तेलाच्या किमती घसरण्याशी जोडलेली

नाही. तर निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या तारखा जाहीर करणे

हे देखील शेअर्सच्या वाढीचे प्रमुख कारण आहे. वृत्तानुसार, कच्च्या तेलाच्या

किमतीत मोठी घसरण झाल्यानंतर सरकारी तेल कंपन्यांना पेट्रोल

आणि डिझेलच्या विक्रीमध्ये १० ते १२ रुपये प्रति लिटर फायदा होत

होता. अशा स्थितीत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल आणि डिझेलच्या

दरात काहीशी कपात होण्याची शक्यता होती. मात्र, तसे झाले नाही, त्यामुळे

सरकारी तेल कंपन्यांच्या शेअर्समध्ये जोरदार वाढ दिसून आली. एचपीसीएलचा

शेअर ४.६८ टक्क्यांच्या वाढीसह ४२४.८० रुपयांवर व्यवहार करत आहे.

बीपीसीएलचे शेअर्स २.२९ टक्क्यांच्या वाढीसह ३४८ रुपयांवर होते, तर

इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचे शेअर्स १.४२ टक्क्यांच्या वाढीसह १६७.७५ रुपयांवर

होते. केंद्रीय निवडणूक आयोगाने मंगळवारी (१५ ऑक्टोबर २०२४) महाराष्ट्र,

झारखंडच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. यासोबतच

आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. वास्तविक, आंतरराष्ट्रीय बाजारात

कच्च्या तेलाच्या किमती घसरल्यानंतर महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा

निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्यापूर्वी इंधन दरात कपात होण्याचा अंदाज

वर्तवला जात होता. आता आदर्श आचारसंहिता लागू झाल्याने ही शक्यता

तूर्तास संपुष्टात आली आहे. त्यामुळे सरकारी तेल कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ

झाली आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/soybean-price-is-higher-than-farmers-diwali-festival/

Related News