पूर्व परवानगीशिवाय पीडीकेव्हीच्या परिसरात प्रवेश नाही

सकाळच्या प्रहरी सुंदर स्वच्छ हवा व नैसर्गिक वातावरण

असल्यामुळे डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ परिसर

नागरिकांचे आवडीचे ठिकाण ठरले आहे. त्यामुळे सकाळी व

Related News

सायंकाळी या परिसरात वर्दळ वाढली आहे. असे असले तरी काही

असामाजिक तत्वांच्या घुसखोरीमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न

निर्माण झाल्याने आता कुणालाही पूर्वपरवानगीशिवाय या

परिसरात प्रवेश दिला जाणार नसल्याचा निर्वाणीचा इशारा

प्रशासनाने दिला आहे. विद्यापीठ परिसरामध्ये सकाळ संध्याकाळ

या वेळी पायी फिरण्यासाठी येणाऱ्या तसेच इतर कामासाठी

विद्यापीठ परिसरातील रस्त्यांचा वापर करणाऱ्या समस्त

नागरिकांना विद्यापीठ प्रशासनाने सुचित केले आहे की विद्यापीठ

परिसरात कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिने तसेच अनुचित घटनेच्या

प्रतिबंधक उपाय योजना म्हणुन विद्यापीठ परिसरात २५ ऑक्टोंबर

२५२४ पासुन प्रवेश नियमन करण्यात येत आहे. ज्या नागरीकांना

सकाळ संध्याकाळ विद्यापीठ परिसरात फिरावयाचे आहे त्यांनी

विद्यापीठाच्या संकेतस्थळावरून २५ ऑक्टोबर पूर्वी रितसर पास

तयार करून घ्यावी व विद्यापीठ प्रशासनास सहकार्य करावे. नमूद

तारखेनंतर विद्यापीठ कर्मचारी सोडून इतर कुठल्याही नागरीकास

पास/प्रवेशपत्रा शिवाय प्रवेश देता येणार नाही. ज्या नागरीकांना

पास काढावयाची आहे त्यांनी क्युआर कोड स्कॅन करुन

ऑनलाईन नोंदणी करावी पासधारक नागरीकांना सकाळी ५ ते

८.३० व सायंकाळी ५ ते ७.३० या वेळेत संबंधीत प्रवेशव्दाराच्या

अनुषंगाने ठरवून दिलेल्या मार्गान व नोंदणीच्या वेळेनुसार

फिरण्याची परवानगी असेल. नोंदणी प्रक्रिया विद्यापीठाचे संकेत

स्थळ www.pdkv. ac.in वर उपलब्ध नोंदणी करताना काही

तांत्रिक अडचण आल्यास कुलसचिव कार्यालयाच्या सामान्य

प्रशासन विभाग येथे संपर्क साधावा. असे आवाहनही विद्यापीठ

प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/threat-of-cyber-crime-in-asia-pacific-countries/

Related News