सणासुदीच्या हंगामात एका आठवड्यात सर्व ऑनलाईन
प्लॅटफॉर्मवर तब्बल ५५ हजार कोटींच्या वस्तूंची विक्री झाली आहे.
मागील वर्षीच्या तुलनेत यात २६ टक्के वाढ झाली आहे.
Related News
राज्यातील सरकारची रचना म्हणजे लुटारूची रचना असल्याचा आरोप
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.
ते म्हणाले, राज्याचं सरकार केवळ तीन लोक चालवत आहे.
बाकीचे ...
Continue reading
नाथवाना (राजस्थान) – भारतमाला एक्सप्रेस हायवेवरील नाथवाणा रेस्ट एरियाजवळ
सोमवारी सकाळच्या सुमारास ज्वलनशील रसायनाने भरलेला टँकर उलटल्याची घटना घडली.
या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाल...
Continue reading
हजारो टन फळे, भाजीपाला आणि रोकड जळून खाक
सीकर (राजस्थान) – सीकर शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीत (कृषी मंडी)
सोमवारी रात्री उशिरा लागलेल्या भीषण आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले.
...
Continue reading
अकोला | १३ एप्रिल २०२५
गांधी नगर सिंधी कॅम्प येथील श्री इच्छेश्वरी माता मंदिर चौक येथे श्री इच्छेश्वर मित्र परिवार
मंडळाच्या वतीने हनुमान जयंती निमित्त भव्य धार्मिक कार्यक्रम...
Continue reading
राखोंडे परिवारा कडुन मिरवणुकीत सहभागी झालेल्या सर्व भीम सैनिकांना थंड पाण्याचे वितरण व आयोजन
साने गुरुजी कला व सांस्कृतिक क्रीडा बहु.मंडळ,पातूर व स्वामी विवेकानंद युवती बहु.
...
Continue reading
दिल्ली – दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील (IGI) टर्मिनल-2 (T2)
सोमवारपासून तात्पुरत्या स्वरूपात देखभाल व सुधारणा कामांमुळे बंद करण्यात आले आहे.
या निर्णयामुळे इं...
Continue reading
श्रीनगर – अमरनाथ यात्रा 2025 साठी आजपासून (15 एप्रिल) नोंदणी प्रक्रियेची सुरुवात झाली आहे.
यावर्षी यात्रेचा कालावधी 3 जुलै ते 9 ऑगस्ट (रक्षाबंधन) असा 39 दिवसांचा असून,
सुमारे 6 ल...
Continue reading
तक्रार केल्यावर पोलिसांनी पीडितेलाच फटकारलं, व्हिडिओ व्हायरल
अलिगढ (उत्तर प्रदेश) – देशभरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या
उत्साहात साजरी केली जात असताना, उत्तर प्रदेशमधी...
Continue reading
फाळेगाव येथे तथागत गौतम बुद्ध मूर्तीची स्थापना.
मंगरूळपीर : आपल्या समाजातील कार्यक्षम भगिनी व बांधवांनी उद्योग क्षेत्रामध्ये आले पाहिजे,
आम्ही डिक्की या दलित उद्योजक संघटनेमा...
Continue reading
अमेरिकन अब्जाधीश जेफ बेझोस यांच्या मालकीची ब्लू ओरिजिन या खासगी
अंतराळ संस्थेने पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. ब्लू ओरिजिनच्या मिशन NS-31 अंतर्गत,
जेफ बेझोस यांची मंगेतर लॉरेन सांच...
Continue reading
वाराणसी |
लखनऊ: वाराणसीमध्ये १९ वर्षीय युवतीवर सात दिवसांत २३ जणांनी सामूहिक
बलात्कार केल्याच्या धक्कादायक प्रकरणानंतर शासनाने मोठी कारवाई केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोद...
Continue reading
खामगाव |
15 एप्रिल: खामगाव-नांदुरा रोडवरील आमसरी फाट्याजवळ आज सकाळी
साडे सात वाजताच्या सुमारास एक भीषण अपघात घडला आहे.
मध्य प्रदेश परिवहन विभागाच्या बस आणि विटांची वाहतूक ...
Continue reading
व्यापाऱ्यांच्या मते, दसरा आणि दिवाळीच्या दरम्यान ऑनलाइन
ऑडर्सची पुन्हा एक लाट येणार आहे. यासाठी सर्व प्लॅटफॉर्म सज्ज
आहेत. सर्वाधिक ऑर्डर मोबाइल फोन, दैनंदिन वापराच्या वस्तू,
इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या आहेत. विक्रीत ७५ टक्के वाटा या
वस्तूंचाच आहे. नवरात्रोत्सवामुळे घरगुती सजावटीचे सामान,
कृत्रिम फ लांचं तोरण यांचा खप अधिक होता. ग्राहकांनी
इलेक्ट्रॉनिक्स, गेमिंग सहाय्यक उपकरणांच्या खरेदीवर भर
दिल्याचं दिसून आलं. फ्लिपकार्ट, मिशो आणि अॅमेझॉन
इंडियावर सणासुदीची विक्री २६ सप्टेंबरपासून सुरु झाली.
आठवडाभरात झालेल्या विक्रीत वार्षिक आधारे ४० टक्के वाढ
झाली. टिअर टू शहरांमधून येणाऱ्या ऑडर्सचा वाटा ४५ टक्के
इतका होता. यंदाच्या सणासुदीच्या हंगामात होणारी जवळपास
५५ टक्के खरेदी २६ सप्टेंबर नंतरच्या पंधरवड्यात झाली आहे.
मागच्या वर्षीच्या हंगामात एकूण ९.७ अब्ज डॉलर्सची ऑनलाइन
खरेदी झाली होती. यंदाच्या हंगामात ही खरेदी वाढून १२ अब्ज
डॉलर्सच्या घरात जाण्याचा अंदाज आहे. यंदा लहान शहरांमधून
येणाऱ्या ऑडर्समध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. वर्ष २०२४ च्या
पहिल्या सहामाहीत ‘युनिफाइड पेमेंट इंटरफेस’च्या (यूपीआय)
माध्यमातून होणाऱ्या पैशांच्या देवघेवीच्या व्यवहारांनी सर्व विक्रम
मोडले आहेत. जानेवारी ते जून २०२४ या काळात यूपीआयद्वारे
७८.९७ अब्ज व्यवहार झाले. आदल्या वर्षीच्या तुलनेत हा आकडा
५२ टक्क्यांनी अधिक आहे. पेमेंट तंत्रज्ञान सेवादाता संस्था
‘वर्ल्डलाइन’नं जारी केलेल्या एका अहवालात ही माहिती देण्यात
आली आहे. अहवालानुसार, मूल्याच्या दृष्टीने पहिल्या सहामाहीत
यूपीआय व्यवहारांत ४० टक्के वाढ झाली. जानेवारी ते जून २०२४
या कालावधीत ११६.६३ लाख कोटी रुपयांची देवाणघेवाण
यूपीआयद्वारे झाली. २०२३ च्या पहिल्या सहामाहीत हा आकडा
८३.१६ लाख कोटी रुपये इतका होता. मूल्य आणि देवघेव यादृष्टीने
यूपीआय पेमेंटच्या बाबतीत फोनपे सर्वोच्च स्थानी राहिल तर
गुगल पे दुसऱ्या, तर पेटीएम तिसऱ्या स्थानी आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/stchi-fare-due-to-bankruptcy-finally-canceled/