छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांच्या विरोधात मोठी कारवाई करण्यात
आली आहे. छत्तीसगडच्या नारायणपूर येथील जंगलात नक्षलवादी
आणि पोलीस यांच्यात मोठी चकमक झाली. या चकमकीत
Related News
भारताला जपानकडून बुलेट ट्रेनची भेट! मुंबई-अहमदाबाद उच्चगती रेल्वे
अकोल्यात केंद्र सरकारविरोधात काँग्रेसचे तीव्र आंदोलन!
मेरठमध्ये धक्कादायक प्रकार : तरुणाची २५ वर्षांनी मोठ्या विधवा महिलेशी फसवून लग्न
राजस्थानमध्ये भीषण अपघात; वरात घेऊन जाणारी बस आणि ट्रकची समोरासमोर धडक….
अकोल्यात पाणी प्रश्न पेटला; शिवसेनेचा जलप्रदाय विभागात घागर मोर्चा, तोडफोड
कोल्हापुरात फुटबॉल सामन्यादरम्यान आयोजकांना पाच हजारांचा दंड
राजकोटमध्ये अपघात; ४ जणांचा मृत्यू, संतप्त नागरिकांचा रस्तारोको
जिल्हा परिषद अकोला : अधिकारी–कर्मचारी, जनतेत तीव्र नाराजी
सुदैवाने जीवितहानी टळली….
मुर्तीजापुरात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांनी घेतली गस्त मोहीम हाती
पारंपरिक शेती करताना शेतकऱ्यांना अनेक अडचणी
सानंदांच्या निष्ठावान कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी ( अजित पवार ) मध्ये प्रवेश
आतापर्यंत ३२ नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात पोलीस आणि
सुरक्षा दलाच्या जवानांना मोठं यश आलं आहे. नक्षलवाद्यांच्या
विरोधातील ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. विशेष
म्हणजे सुरक्षा दल आणि नक्षलवादी यांच्यात अजूनही चकमक
सुरु असल्याची माहिती आहे. त्यामुळे चकमकीत मारल्या
जाणाऱ्या नक्षलवाद्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. या
चकमकीत पोलीस आणि सुरक्षा दलाच्या जवान जखमी किंवा
कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली
नाही. पण या कारवाईत पोलिसांना नक्षलवाद्यांकडील एके ४७
सारखे अनेक हत्यार, तसेच स्फोटके बनवण्याचं सामान मिळाले
आहे. सर्व हत्यार पोलिसांनी जप्त केले आहेत. स्थानिक पोलिसांना
नक्षलवाद्यांबद्दल महत्त्वाची माहिती मिळाली होती. नारायणपूर-
दंतेवाडी सीमेवर माड परिसरात मोठ्या प्रमाणात नक्षलवादी
असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलीस आणि सुरक्षा
दलाच्या जवानांकडून संयुक्तरित्या अँट नक्शल ऑपरेशन सुरु
करण्यात आलं. यावेळी नक्षलवाद्यांकडून पोलिसांच्या दिशेला
गोळीबार सुरु करण्यात आला. यानंतर पोलिसांनी प्रत्युत्तर म्हणून
गोळीबार सुरु केला. गडचिरोलीपासून अडीचशे किलोमीटरवर हे
घटनास्थळ आहे. छत्तीसगडच्या दंतेवाडा व नारायणपूर या दोन
जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागातील दक्षिण अबूझमाडमध्ये काही
नक्षली दबा धरुन बसल्याची माहिती छत्तीगडच्या सुरक्षा यंत्रणेला
मिळाली होती. त्यानुसार दोन्ही जिल्ह्यांच्या सुरक्षा यंत्रणांनी
संयुक्तपणे नक्षल्यांविरोधात अभियान राबविले. यावेळी अचानक
जवानांच्या दिशेने नक्षल्यांनी गोळीबार केला. या चकमकीत
आतापर्यंत ३२ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात पोलिसांना यश
आलं आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/mukesh-ambani-mutual-fund-entry/