राहुल गांधींविरोधात भाजपचे आज राज्यभर आंदोलन

अमेरिका

अमेरिका दौऱ्यावर असताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी

भारतातील आरक्षण संपवण्याबाबत वक्तव्य केले होते.

आरक्षणासंदर्भात केलेल्या या विधानानंतर भारतीय जनता

Related News

पक्ष चांगलात आक्रमक झाला आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज

(13 सप्टेंबर) राज्यभरात राहुल गांधी यांच्याविरोधात भाजपतर्फे

आंदोलन करण्यात येणार आहे. याचदरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष

चंद्रशेखर बावनकुळे हे अकोल्यात तर आशिष शेलार आणि

पंकजा मुंडे हे मुंबईत आंदोलन करणार आहेत. तसेच पुण्यात

भाजपच्या वतीने उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या

नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात येणार हे. पुणे जिल्हाधिकारी

कार्यालयासमोर आज दुपारी 12 वाजता आंदोलनाला सुरुवात

करण्यात आली. तर दुसरीकडे राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ काँग्रेस

पक्षातर्फेही आज राज्यभरात आंदोलन होणार आहे. भारतीय जनता

पक्षाच्या आंदोलनाला प्रत्युतर म्हणून काँग्रेसतर्फे हे आंदोलन करण्यात

येणार आहे. एकंदरच राहुल गांधी यांच्या आरक्षणावरील वक्तव्यारून

मोठा वाद होण्याची शक्यता असून आज राज्यभरातील आंदोलनाद्वारे

भाजप त्यांच्याविरोधात रान उठवण्याची शक्यता आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/arvind-kejriwal-will-be-out-of-prison-after-177-days/

Related News