मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात
आलं आहे. खराब हवामानामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं हेलिकॉप्टर
पुण्यातील लांडेवाडी परिसरात उतरवण्यात आले आहे. एकनाथ शिंदे हे
Related News
ड्रोनच्या नजरेतून ‘ऑपरेशन क्लीन’
स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी
खडकीत माणुसकीचं दर्शन:
गुंगीचे औषध देऊन विवाहितेचे लैंगिक शोषण:
पाकिस्तानच्या हाती असलेले अण्वस्त्र सुरक्षित आहेत का?
भारताच्या एअर स्ट्राईकनं पाकच्या चिंध्या-चिंध्या…
“परी आहे मी”… अभिनेत्री तेजस्वी प्रकाशचा ग्लॅमरस अंदाज!
IPL 2025: किती परदेशी खेळाडू IPL साठी परत येणार?
जगातील सर्वात गरीब राष्ट्रपती, कधीच राष्ट्रपती भवनात राहिले नाहीत…
चाकणमध्ये महिलेला फरफटत निर्जनस्थळी नेऊन बलात्कार;
जम्मू-कश्मीरमध्ये ‘शोधून शोधून ठोकलं’;
छत्रपती संभाजीनगरमध्ये दरोडेखोरांचा कहर:
भिमाशंकरमध्ये दर्शनसाठी जात होते. मात्र या खराब हवामानाचा फटका
एकनाथ शिंदेंच्या दौऱ्याला बसला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज
श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे सहकुटुंब दर्शनासाठी जाणार आहेत. आज श्रावण
महिन्यातील शेवटचा सोमवार असल्याने एकनाथ शिंदे हे श्रीक्षेत्र भीमाशंकर
येथे पवित्र शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी जात आहेत. मात्र भीमाशंकर इथे
खराब हवामान आहे. यामुळेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टर
पुण्यातील आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडीत उतरवण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, सध्या भीमाशंकर परिसरात मोठ्या प्रमाणामध्ये धुके
पाहायला मिळत आहे. याच खराब हवामानाचा फटका मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाही
बसला आहे. भीमाशंकरला खराब हवामान असल्यामुळे मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर
लांडेवाडीत उतरवण्यात आले आहे. शासकीय प्रोटोकॉलनुसार, एकनाथ शिंदे यांचे
हेलिकॉप्टर भीमाशंकर या ठिकाणी उतरवण्यात येणार होते. मात्र भिमाशंकरमध्ये
धुकं, पाऊस असे खराब हवामान आहे. या हवामानामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
यांचे हेलिकॉप्टर आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडी उतरविण्यात आले
Read also: https://ajinkyabharat.com/2-year-old-girl-dies-due-to-collapse-of-timber-wall-in-mathura/