केसांच्या सर्व समस्या होतील दूर
आपल्या घरासमोर किंवा बागेत जर जास्वंदीच्या फुलांचे झाड असेल
तर त्याचा केवळ गणपती बाप्पााच्या पूजेसाठी उपयोग होत नाही तर
Related News
मोखा ग्रामपंचायतीचा बेजबाबदार कारभार :
अवकाळी पावसाचा वणीसह परिसराला तडाखा;
दहीगाव प्रकरणाचा निषेध; तेल्हारा शहर बंद, बाजारपेठा ठप्प
अलीगढमधील हॉटेलमध्ये देवतांच्या चित्रांसह नॅपकिन दिल्याने गोंधळ;
पाच वर्षांनंतर कैलास-मानसरोवर यात्रेला पुन्हा सुरूवात;
चंदननगरमध्ये तरुणाचा निर्घृण खून
पातूर शहरात ‘रान कसायांची’ टोळी सक्रिय
अकोल्यात गुड फ्रायडे भाविकतेने साजरा;
एका महिन्याच्या चिमुरडीची निर्घृणपणे हत्या….
काही सेकंदांची चूक आणि आयुष्य संपलं…
जय श्री राम ग्रुप द्वारा गौसेवा कार्य
ईस्टर संडेच्या तयारीने धार्मिक वातावरण भारावले
आयुर्वेदानुसार जास्वंदीचे फुले आणि पाने देखील केसांच्या आरोग्यासाठी
टॉनिक म्हणून काम करतात. या फुलांपासून आपण केसांसाठी उत्तम तेल
घरच्या घरी बनविता येणार आहे. बागेतील जास्वंदच्या फुलांचे तेल तयार करता येते.
घरात आपण जास्वंदीच्या तेलाचे वापर करुन तेल बनविण्याची रेसिपी
एकदम सोपी आहे. त्यासाठी तुम्हाला केवळ लाल रंगाची जास्वंदीची फुले
असायला हवीत, किंवा तुम्ही फुल बाजारातून देखील जास्वंदीचे लाल फुले विकत आणू शकता.
जास्वंदीच्या फुलात अनेक एण्टी ऑक्सीडेंट्स गुणधर्म असतात. अमिनो एसिड्स
आणि फ्लेवेनाईड्स देखील त्यात असतात.त्यामुळे केसांच्या मुळांचे पोषण
आणि हानिकारक अल्ट्रा व्हॉयलेट किरणांपासून त्याचे संरक्षण होते.
या फुलांपासून तयार केलेले तेल वापरल्यास केसांच्या मुळांना मजबूती मिळते.
हे तेल बनवून साठवून देखील ठेवता देखील येते, त्यामुळे हे तेल केसांना
दररोज लावल्यास केसांची गळती पूर्णपणे थांबते.
जास्वंदीचे तेल कसे तयार करावे
जास्वंद तेल तयार करण्यासाठी 10-15 जास्वंदीचे फुले आणा. ही फुले लाल रंगाची
असावीत सोबत जास्वंदीच्या झाडाची काही पाने देखील आणा, या पानांना आणि
फुलांना चांगले स्वच्छ पाण्याने धुवून काढा, त्यातील पाने आणि फुलांतील पाणी
सुकण्यासाठी ती चांगली पंख्याखाली ठेवा, नंतर एका कढईत खोबरेल तेल ओतून
ही पाने आणि फुले टाकून चांगली शिजवा. जोपर्यंत तेलाचा रंग लाल होत नाही तोपर्यंत
हे मिश्रण उकळा. तेल हलक्या लाल तांबूस रंगाचे झाले की ही कढई तशीच सहा
ते सात तास बंद करून सुरक्षित ठिकाणी ठेवा. नंतर तेल थंड झाल्यावर ते एका
बाटलीत भरुन ठेवा. हे तेल नियमित झोपताना मसाज करुन केसांच्या मुळांना लावा.
आठवड्यातून किमान दोन वेळा हे तेल केसांच्या मुळांना नीट लावा.
त्यामुळे केसांचे आरोग्य सुधारण्यास मदत होईल.
Read also: https://ajinkyabharat.com/anil-ambani-faces-fine-of-rs-25-crore-and-gets-imprisoned-for-five-years/