Bigg Boss Marathi : “मीच चोरली चावी!” प्रभूचा बिनधास्त खुलासा; घरात प्राजक्ता-रोशन संतापले
Bigg Boss Marathi च्या घरात सध्या गेमने जबरदस्त कलाटणी घेतली असून प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. नुकत्याच समोर आलेल्या Bigg Boss Marathi प्रोमोमध्ये प्रभू शेळकेने खेळलेली चाल संपूर्ण घरासाठी धक्कादायक ठरली आहे. “वेडं बनवून पॉवर की मिळवली” अशीच चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगताना दिसत आहे.
Bigg Boss Marathi शोला सुरुवात होऊन आता महिना उलटला आहे. या एका महिन्यात घरातील समीकरणे अक्षरशः बदलून गेली आहेत. सुरुवातीला घट्ट वाटणाऱ्या मैत्रीमध्ये दुरावा आला, तर काही अनपेक्षित युतीही तयार झाल्या. यंदाच्या सीझनची खास संकल्पना म्हणजे ‘पॉवर की’. ज्याच्या हातात पॉवर की असते, त्याला घरात विशेष सवलती आणि अधिकार मिळतात. त्यामुळे प्रत्येक सदस्याची नजर दुसऱ्याच्या पॉवर की वर आहे. गेमपेक्षा चोऱ्या आणि डावपेच अधिक रंगताना दिसत आहेत.
काही दिवसांपूर्वी प्राजक्ता शुक्रेने तिची पॉवर की गायब झाल्याची तक्रारBigg Boss कडे केली होती. तेव्हापासून घरात संशयाचे वातावरण निर्माण झाले होते. प्रत्येक जण एकमेकांकडे शंकेच्या नजरेने पाहत होता. अखेर आजच्या भागाच्या प्रोमोमध्ये या रहस्यावरचा पडदा उघडला गेला. प्रभू शेळकेनेच प्राजक्ताची पॉवर की चोरल्याचे उघड झाले.
Related News
नेपाळ : महापुराने संसार उद्ध्वस्त केला, पण कुत्र्याची आशा कायम; मालकाच्या प्रतीक्षेत 5 दिवस
गणेशोत्सवात डीजेच्या वादात न पडता सांस्कृतिक पद्धतीने उत्सव साजरा करा; फडणवीसांचे पुणेकरांना आवाहन
राहुल गांधींचे 40 पैकी29 मुद्दे खोटे; फडणवीसांचा दावा, ‘छात्रों की गूंज’वर जोरदार हल्लाबोल!
अभिजीत दीपके यांच्या 5 सप्टेंबरच्या दिल्ली आंदोलनाला सर्वोच्च न्यायालयाचा नकार नाही; मोर्चाचा मार्ग मोकळा
2030 पर्यंत पेट्रोल-डिझेलची 50% गरज शेतकरी, तर 50% EVमधून पूर्ण होणार; फडणवीसांचा मोठा दावा
Prashant Kishor यांनी विजयाचा प्लॅन दिला, पण राष्ट्रवादीनेच केली मोठी चूक; पक्षात खळबळ!
Katrina – Vicky Love Story : कतरिनाला विकी आवडतो हे कधी कळलं? जाणून घ्या दोघांच्या प्रेमकहाणीची खास गोष्ट
घटस्फोट झाला तरी जॉइंट होम लोनची EMI थांबत नाही! कर्जाची जबाबदारी कोणाची?
मनोज जरांगेंच्या प्रकृतीबाबत चिंता वाढली! शुगर रिपोर्टवरच जरांगेंचा सवाल; म्हणाले, “पत्रकारांनी सोक्षमोक्ष लावावा”
हृता दुर्गुळेचा हटके लूक चर्चेत! दोन वेण्या अन् मोठे कान पाहून चाहतेही म्हणाले ‘आरे बापरे!’
Bigg Boss Marathi प्रोमोमध्येBigg Boss जाहीर करतात की ज्याने प्राजक्ताची पॉवर की चोरली असेल त्याला सर्व पॉवर की चे अधिकार मिळतील. हे ऐकताच प्रभू सर्वांसमोर ती चावी बाहेर काढतो. हा क्षण पाहून घरातील सदस्य स्तब्ध होतात. प्राजक्ता संतापाच्या भरात प्रभूला “तू चोर आहेस” असे म्हणत सुनावते. तिचा राग आणि नाराजी स्पष्ट दिसून येते.
याचदरम्यान प्रभू आणि रोशन यांच्यातही जोरदार वाद रंगताना दिसतो. रोशन प्रभूच्या वागण्यावर आक्षेप घेतो, तर प्रभूही मागे हटत नाही. “मी चोरली चावी, काय करायचंय ते करा,” असे तो ठामपणे म्हणतो. रोशन भडकून त्याला सुनावतो की “लहान लहान म्हणता म्हणता जास्तच बोलायला लागलाय.” या संवादामुळे घरातील वातावरण अधिकच तापलेले दिसते.
सोशल मीडियावर मात्र प्रेक्षकांची प्रतिक्रिया वेगवेगळी आहे. अनेकांनी प्रभूच्या धाडसी आणि चलाख खेळीचे कौतुक केले आहे. “प्रभूने गेम पालटला,” “वाह प्रभू एक नंबर,” अशा कमेंट्स पाहायला मिळत आहेत. काही जणांचे मत आहे की तो इतरांपेक्षा अधिक स्मार्टपणे खेळत आहे. यापूर्वी ‘भाऊच्या धक्क्या’वरही त्याच्या खेळाचे कौतुक झाले होते. तन्वीला कॅप्टन होण्यासाठी त्याने दिलेली मदतही चर्चेत आली होती.
दरम्यान, घरातून नुकतेच सचिन कुमावत बाद झाले आहेत. त्यापूर्वी सोनाली, राधा, आयुष, करण, ओमकार आणि दिव्या शिंदे यांना घराचा निरोप घ्यावा लागला होता. त्यामुळे स्पर्धा दिवसेंदिवस अधिक चुरशीची होत चालली आहे.
आता प्रभूच्या या धाडसी चालीमुळे घरातील समीकरणे पुन्हा एकदा बदलणार का, प्राजक्ता पुढे काय पाऊल उचलणार आणि रोशन-प्रभू यांच्यातील वाद किती वाढणार, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. बिग बॉस मराठी 6 मध्ये पुढे काय होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
