नगरपरिषद प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नगरपालिकेच्या जुन्या अग्निशमन दलाच्या उभ्या असलेल्या गाडीचे चाक अज्ञात इसमाने जॅकच्या साहाय्याने काढून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. मात्र या गंभीर प्रकाराबाबत अद्याप पोलीस ठाण्यात कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नसल्याने नगरपरिषद प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी नगरपरिषदेकडून तीन नवीन अग्निशमन गाड्या आणि दोन बुलेट वाहने खरेदी करण्यात आली होती. या वाहनांचे उद्घाटन आमदार हरीश पिंपळे यांच्या हस्ते करण्यात आले. मात्र, या नव्या वाहनांचा वापरही नियमांनुसार होत नसल्याचे दिसून येत आहे. अग्निशमन विभागासाठी खरेदी केलेले बुलेट वाहन एका कर्मचाऱ्याकडून शासकीय कामांसोबतच वैयक्तिक वापरासाठीही वापरले जात असल्याची बाब समोर आली आहे.
शासनाच्या निधीतून लाखो रुपये खर्च करून अत्याधुनिक साधनसामग्री उपलब्ध करून देण्यात आली असली, तरी प्रत्यक्षात विभागाकडे प्रशिक्षित चालक आणि फायरमनच उपलब्ध नसल्याचे वास्तव समोर आले आहे. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत आग विझवण्यासाठी साधने असूनही त्यांचा उपयोग होणार कसा, हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. शहराच्या सुरक्षेचा मुद्दा त्यामुळे ऐरणीवर आला आहे.
Related News
मुर्तिजापूर : गणेशोत्सव नवरात्र आणि दसरा या आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मुर्तिजापूर पोलिसांनी शहरात शस्त्र स...
Continue reading
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) CBT आणि नॉर्मलायझेशन पद्धतीविरोधात मूर्तिजापूरातील विद्यार्थ्यांनी आमदार हरीश पिंपळे यांना निवेदन दिले. OMR पद्धत कायम...
Continue reading
पुण्यातील एफसी रोडवर मोबाईलवर बोलत स्कूटी चालवणाऱ्या तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. "मी पुणे विकत घेतलंय" असे म्हणत तो घटनास्थळावरून ...
Continue reading
मोशी दुर्घटना: 83 तासांच्या अथक बचावकार्यानंतर 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू; अजूनही एकाचा शोध सुरू
पिंपरी-चिंचवडमधील मोशी येथील कचरा डेपोमध्ये घडलेल्या भीषण ...
Continue reading
बनावट सोयाबीन बियाणे प्रकरण : शिवसेना (उबाठा)ची मोठी मागणी, शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपयांची भरपाईमुर्तिजापूरमध्ये निकृष्ट व बनावट सोयाबी...
Continue reading
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने वर्ध्यातील गोरस भंडारावरील FDA ची कारवाई बेकायदेशीर ठरवत परवाना तातडीने बहाल करण्याचे आदेश दिले. तुकाराम मु...
Continue reading
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आमदार हरीशभाऊ पिंपळे यांनी बोगस बियाण्यांच्या गंभीर प्रश्नावर सरकारला धारेवर धरले. दोषी कंपन्यांवर कारवाई,...
Continue reading
मूर्तिजापूर : समता नगर येथील महाराष्ट्र संगीत विद्यालयात संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ मार्गदर्शक स्व. रामकृष्ण कोल्हाळे गुरुजी यांच्या पुण्यतिथीनिमित्त संगीतमय आदरांजली कार्यक्रम आयोज...
Continue reading
मामा-भाचीने रेल्वे रुळावर घेतली उडी; 108 रुग्णवाहिकेच्या तत्परतेने वाचले 2 जीव
अकोला जिल्ह्यात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला ...
Continue reading
बाळापूर तालुक्यातील कारंजा रमजानपूर येथील रहिवासी व निंबा फाटा परिसरातील प्रसिद्ध हार्डवेअर व्यावसायिक शिवशंकर तुळशीराम झाडे (वय 52) यांच...
Continue reading
सरसकट कर्जमुक्तीच्या मागणीसाठी रविकांत तुपकर यांच्या अन्नत्याग आंदोलनाला समर्थन देत मूर्तिजापूरात शेतकऱ्यांनी भाजीपाला आणि दूध रस्त्यावर टाकून...
Continue reading
लातूरचे खासदार डॉ. शिवाजी काळगे यांनी मांडली आकडेवारी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
सार्वजनिक जीवनात प्रवेश केल्यानंतर अनेक लोकप्रतिनिधींच्य...
Continue reading
याशिवाय, अग्निशमन विभागाच्या कार्यालयातच ‘आधार केंद्र’ सुरू करण्यात आल्याने विभाग अक्षरशः बेघर झाल्याचे चित्र आहे. अत्यावश्यक सेवेसाठी असलेल्या विभागावरच अशा प्रकारे गदा येणे, ही प्रशासनाच्या संवेदनशीलतेवर मोठी शंका उपस्थित करणारी बाब ठरत आहे.
नगरपरिषद कर्मचाऱ्यांची मनमानी इतक्या टोकाला गेली आहे की, अग्निशमन विभागात सफाई कामगारांकडून काम करून घेतले जात असल्याची माहितीही समोर आली आहे. प्रशिक्षित मनुष्यबळाच्या अभावात यंत्रणा हाताळली जात असल्यास भविष्यात मोठा अनर्थ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या प्रकरणाबाबत मुख्याधिकारी निलेश जाधव यांनी सांगितले की, “सदर चोरीचा प्रकार हा १ ते २ वर्षांपूर्वीचा असून तो माझ्या कार्यकाळापूर्वीचा आहे. त्या वेळी पोलिसात तक्रार दाखल न होणे हे आश्चर्यकारक आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल.”
एकीकडे चाक चोरीसारख्या गंभीर घटनेवर मौन, तर दुसरीकडे वाहनांचा गैरवापर, मनुष्यबळाचा अभाव आणि विभागाला बेघर करणारे निर्णय—या सर्व बाबींमुळे नगरपरिषद प्रशासनाची कार्यक्षमता पुन्हा एकदा संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
read also : https://ajinkyabharat.com/sangli-news-shocking-ulgada-aine-2-mulanchi-20-20-thousand-sales-big-revelation-in-3rd-case/