कोरपना : पंचायत समिती कोरपना अंतर्गत बारावीची परीक्षा 10 फेब्रुवारी 2026 पासून सुरू होत असून परीक्षेच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभाग पूर्णपणे सज्ज झाला आहे. तालुक्यातील एकूण सहा परीक्षा केंद्रांवर 1525 विद्यार्थी परीक्षा देणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. परीक्षा सुरळीत, पारदर्शक आणि कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, नागपूर विभागीय मंडळाच्या निर्देशानुसार यंदा प्रथमच सर्व परीक्षा केंद्रांच्या परिसरात तसेच प्रत्येक वर्गखोलीत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्यामुळे परीक्षा प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवणे शक्य होणार असून गैरप्रकारांना आळा बसणार आहे. तालुक्यातील सर्व केंद्रांवर सीसीटीव्ही यंत्रणा बंधनकारक करण्यात आल्याने विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित आणि शिस्तबद्ध वातावरण निर्माण होणार आहे.
यासोबतच प्रत्येक परीक्षा केंद्रावर बैठे पथकाचीही नियुक्ती करण्यात आली आहे. हे पथक परीक्षा सुरू असताना पूर्ण वेळ केंद्रांवर उपस्थित राहून देखरेख करणार आहे. कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार होऊ नये, तसेच परीक्षा निर्विघ्न पार पडावी यासाठी प्रशासन विशेष दक्षता घेत आहे.
Related News
अभिजीत दीपकेंना मोठा झटका? सरकारी शाळांमध्ये ‘नो एंट्री’; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश
राजस्थान-उत्तर प्रदेशातील सरकारी शाळांमध्ये बाहेरील व्यक्ती, पत्रकार आणि यूट्यूबर्सना पूर्...
Continue reading
Abhijeet Dipke: ‘मी अमेरिकेतून तुरुंगात जाण्यासाठीच आलो’; अभिजीत दीपकेंच्या नव्या वक्तव्याने वेधले लक्ष
कॉकरोच जनता पार्टी (CJP) चे स...
Continue reading
दादा भुसे यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर छगन भुजबळांचं थेट विधान; ‘हजारो शाळा आहेत, सर्व काही व्यवस्थित असल्याचा दावा नाही’
शिक्षणमंत्री द...
Continue reading
अभिजीत दिपके यांनी थेट मागितला शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा; जिल्हा परिषद शाळांच्या अवस्थेवरून महायुती सरकारला घेरले
कॉकरोच जनता पार्टीचे अध्...
Continue reading
अकोला शिक्षक बदली घोटाळ्यावर प्रशासनाचा मोठा प्रहार! 33 शिक्षक निलंबित, 65 जणांची वेतनवाढ रोखली; 136 दोषींवर कठोर कारवाई
अकोला : अकोला जिल्हा परिषद शिक्...
Continue reading
धक्कादायक रिपोर्ट : २ लाखांची फी, JEE मध्ये फक्त २ ते ५% यश; डमी स्कूल आणि कोचिंग क्लासेसचा मोठा पर्दाफाश
अकोल्यात कोचिंग क्लासेसची कोट्यवधींची उलाढाल असू...
Continue reading
मुंबईत 164 अनधिकृत शाळांचा धक्कादायक खुलासा! शेकडो विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात;
राज्यातील शिक्षण व्यवस्थेसमोर एक गंभीर प्रश्न पुन्हा एकदा उभा राहिल...
Continue reading
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने विदर्भातील शाळा १५ किंवा २२ जूनपासून सुरू करण्याचा निर्णय रद्द केला आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्य, तीव...
Continue reading
मोठा दिलासा! विदर्भातील शाळा तब्बल 7 दिवस उशीरा सुरू; शिक्षण विभागाचा महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक निर्णय
विदर्भातील वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर रा...
Continue reading
महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय! 13 विभागांची पुनर्रचना, प्रशासन होणार अधिक वेगवान; मंत्रिमंडळ बैठकीत 4 महत्त्वपूर्ण निर्णयमुंबई : मुख्यमंत्री दे...
Continue reading
मुंबई : बारावीच्या परीक्षा, उत्तरपत्रिका तपासणी आणि निकाल प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या हजारो शिक्षकांना आता स्वतःच्या मानधनासाठी संघर्ष करावा लागत असल्याचे चित्र समोर आल...
Continue reading
महाराष्ट्रातील ज्युनिअर कॉलेजांत ‘बायोमेट्रिक’ हजेरी सक्तीची; ७५% उपस्थिती नसल्यास बारावी परीक्षेला बसता येणार नाही
पुणे : राज्यातील कनिष्ठ महाविद...
Continue reading
कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा होण्यासाठी विद्यार्थ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात आले असून नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारच्या अफवा किंवा गैरप्रकारांपासून दूर राहून आत्मविश्वासाने परीक्षा द्यावी, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
याबाबत माहिती देताना पंचायत समिती कोरपनाचे गटशिक्षणाधिकारी तथा परिरक्षक कल्याण जोगदंड यांनी सांगितले की, “परीक्षा सुरळीत आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज असून विद्यार्थ्यांनी निर्धास्तपणे परीक्षा द्यावी.”
read also : https://ajinkyabharat.com/israel-president-australia-visit-2026-shocking-bondi-beach-attack-sydneyt-3000-police-security-high-alert/