येथील ज्यूबिली इंग्लिश स्कूल, मूर्तिजापूर येथे आयोजित क्रीडा सप्ताहाचा बक्षीस वितरण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नवनिर्वाचित नगरसेवक पंकज कांबे आणि राजेंद्र भटकर उपस्थित होते, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य श्री. प्रशांत भारती होते. यावेळी वरिष्ठ शिक्षिका सौ. खाणझोडे आणि सौ. तायडे मंचावर उपस्थित होत्या.
क्रीडा सप्ताहादरम्यान कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, धावणे, उंच उडी, लांब उडी आणि गोळाफेक अशा विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत आपले उत्कृष्ट क्रीडाकौशल्य दाखवून दिले. स्पर्धांमुळे शाळेच्या परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
बक्षीस वितरण समारंभात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विविध स्पर्धांतील विजेत्या खेळाडूंना चषक, पदके आणि प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे उपस्थितांनी जोरदार कौतुक केले. मार्गदर्शन करताना प्रमुख पाहुण्यांनी सांगितले की, क्रीडा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा शारीरिक आणि मानसिक विकास होतो. तसेच शिस्त, संघभावना आणि नेतृत्वगुण विकसित होण्यास मदत होते, असेही त्यांनी नमूद केले.
Related News
अभिजीत दीपकेंना मोठा धक्का! सरकारी शाळांमध्ये ‘नो एंट्री’; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
कुरणखेडच्या गजानन महाराज विद्यालयाचा कायापालट! माजी विद्यार्थ्यांकडून 10 हून अधिक भौतिक सुविधांचे लोकार्पण
CAP Registration 2026: फक्त 30 जूनपर्यंत मुदत! एलएलबी, बीपीएड, एमपीएड प्रवेशासाठी तातडीने करा नोंदणी
धक्कादायक! एआय व्हिडीओ व्हायरलची धमकी देत महिलेचा छळ; मूर्तिजापूरातील 25 वर्षीय युवकाविरुद्ध गुन्हा
MU Admission 2026: दुसऱ्या गुणवत्ता यादीत मोठा दिलासा! विज्ञान शाखेच्या कटऑफमध्ये तब्बल 9% घसरण
JEE Advanced 2026 Result: धडाकेबाज निकाल जाहीर! 330 गुणांसह शुभम कुमार देशात अव्वल, पाहा टॉप 10 रँकर्स
लाखपुरीत धक्कादायक घटना! 2 दुचाक्या जळून खाक, लाखोंचे नुकसान; दोषींवर कठोर कारवाईची जोरदार मागणी
‘इको-फ्रेंडली’ होळी आणि ‘सशस्त्र सेना ध्वज दिन’ निधी संकलन उपक्रम उत्साहात संपन्न
मूर्तिजापूरमध्ये अग्निशमन दलाच्या गाडीचे चाक चोरीला; तक्रार नाही, प्रशासनावर प्रश्नचिन्ह
स्काऊट गाईड चळवळीतून माणूस घडवणारे शिक्षण – आ. प्रकाश भारसाकळे यांचे प्रतिपादन
माना पोलिसांची धडाकेबाज कारवाई : बकरी चोरी प्रकरणातील फरार तीन आरोपी अटकेत, चारचाकी-दुचाकी जप्त
पातुर येथील हाजी सैय्यद अकबर उर्दू हायस्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
यावेळी राजेंद्र भटकर यांनी वऱ्हाडी कवितेद्वारे विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीचा संदेश देत क्रीडा आणि निरोगी जीवनशैलीचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांच्या कवितेला विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. कोमल भारतवाज यांनी केले, तर आभार प्रदर्शन सौ. पूनम गवारे यांनी मानले. क्रीडा सप्ताह आणि बक्षीस वितरण समारंभ यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाप्रती आवड वाढण्यास आणि सर्वांगीण विकासाला चालना मिळण्यास मदत होणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
