डॉ. वसंतराव काळे यांना जीवन गौरव पुरस्कार
अकोट : स्काऊट-गाईड चळवळ ही देशासाठी आदर्श नागरिक घडविणारी आणि व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देणारी महत्त्वपूर्ण चळवळ आहे. या चळवळीतून विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक ज्ञानच नव्हे तर शिस्त, नेतृत्व, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रसेवेची प्रेरणा मिळते, असे प्रतिपादन अकोट विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश भारसाकळे यांनी केले. ते तालुका तेल्हारा येथील गुलालशेष महाराज संस्थान, मनब्दा येथे ४ फेब्रुवारी रोजी आयोजित भारत स्काऊट आणि गाईडच्या ३६ व्या तीन दिवसीय जिल्हा मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षीय भाषण करत होते.
शालेय शिक्षण विभाग, जिल्हा परिषद अकोला यांच्या सहकार्याने ४ ते ६ फेब्रुवारी २०२६ दरम्यान या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. विधान परिषदेचे सदस्य आमदार किरण सरनाईक यांच्या हस्ते मेळाव्याचे विधिवत उद्घाटन झाले. कार्यक्रमाला जिल्हा मुख्य आयुक्त तथा प्राथमिक शिक्षणाधिकारी रतनसिंग पवार, गटविकास अधिकारी अशोक बांबर, सहाय्यक गटविकास अधिकारी शहीद अख्तर, मनब्दा गावाच्या सरपंच सौ. सीमा पार्थीकर, उपसरपंच शेषराव पोहरकर, गटशिक्षणाधिकारी सौ. सुनीता तळोकार, गुलालशेष महाराज संस्थानचे अध्यक्ष विजय पार्थ्रीकर, उपाध्यक्ष सुभाष शिखरे, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष विलास खुमकर यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच माजी राज्य आयुक्त (स्काऊट) डॉ. वसंतराव काळे, सामाजिक कार्यकर्ते बजरंग पार्थ्रीकर आणि विश्वासराव पार्थ्रीकर यांचीही प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी स्काऊट-गाईड चळवळीत केलेल्या सातत्यपूर्ण आणि उल्लेखनीय कार्याबद्दल माजी राज्य आयुक्त डॉ. वसंतराव काळे यांना ‘पी. टी. बाळापुरे स्काऊट-गाईड जीवन गौरव पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते झालेल्या या सन्मानामुळे उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे अभिनंदन केले. आपल्या कार्यातून अनेक विद्यार्थ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणल्याबद्दल काळे यांचे विशेष कौतुक करण्यात आले.
Related News
मोशी कचरा डेपो दुर्घटनेनंतर गायकवाड कुटुंबावर दु:खाचा डोंगर; पतीनंतर पत्नीनेही उचललं टोकाचं पाऊल
अकोला पासपोर्ट कार्यालयाचा ‘महत्त्वपूर्ण विस्तार’ होणार? खासदार अनुप धोत्रे यांची एस. जयशंकरांकडे ठोस मागणी; 1लाख नागरिकांना मोठा दिलासा
अकोल्यात विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; धमकीच्या फोननंतर घडली धक्कादायक घटना , 5 मिनिटांत संपलं आयुष्य!
अकोला शिक्षक बदली घोटाळा: 33 शिक्षक निलंबित, 65 जणांची वेतनवाढ रोखली | 136 दोषींवर मोठी कारवाई
‘मी विसरायला लागलो…’ भाषणात अमित ठाकरे अचानक ब्लँक; स्टेज सोडून 10 मिनिटांनी केले पुनरागमन
5 मोठे कायदेशीर मुद्दे : अंतरिम स्थगिती म्हणजे अंतिम विजय नाही; बाळापूर नगर परिषद प्रकरणाचा संपूर्ण खुलासा
अवैध जात प्रमाणपत्रामुळे अकोला महापालिकेतील 3 नगरसेवक अपात्र; राजकारणात मोठी खळबळ
ITI Admission 2026: दुसऱ्या फेरीला वेग, ‘इलेक्ट्रिशियन’सह 10 ट्रेड्सना प्रचंड मागणी; प्रवेशाची सुवर्णसंधी
आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर मुर्तिजापूरात पोलिसांचा शस्त्र सराव व रूट मार्च
MPSC Exam 2026 : 5 मोठी कारणे; CBT निर्णयाला तीव्र विरोध, OMR पद्धत कायम ठेवण्याची जोरदार मागणी
20,931 विद्यार्थ्यांचा विक्रमी प्रवेश! जिल्हा परिषद शाळांचा मोठा विजय; पहिलीच्या प्रवेशात 4 तालुक्यांची दमदार बाजी
मेळाव्याच्या प्रारंभी मान्यवरांचे आगमन होताच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मांजरी येथील लेझीम पथकाने आणि कोठारी कॉन्व्हेंट, अकोला येथील स्लोमार्च पथकाने आकर्षक सलामी देत त्यांचे स्वागत केले. सैनिकी शाळा गायगाव आणि वसंतराव विद्यालय, कोराडी येथील स्काऊट-गाईड विद्यार्थ्यांनी मानवंदना देऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मनब्दा, श्रीनाथ विद्यालय मनब्दा आणि स्वर्गीय बाबासाहेब खोटरे विद्यालय, शिरसोली येथील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमात डॉ. वसंतराव काळे आणि आमदार किरण सरनाईक यांनीही समयोचित मनोगते व्यक्त केली. विद्यार्थ्यांनी स्काऊट-गाईड चळवळीत सक्रिय सहभाग घेऊन समाजासाठी जबाबदार नागरिक बनावे, असे आवाहन त्यांनी केले. शिक्षणाधिकारी रतनसिंग पवार यांनी प्रास्ताविकातून मेळाव्याची पार्श्वभूमी स्पष्ट करताना अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळते, असे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा प्रशिक्षण आयुक्त (स्काऊट) श्रीकृष्ण डांबलकर यांनी केले, तर मेळावा प्रमुख राजेश पातळे यांनी आभार प्रदर्शन केले. या जिल्हा मेळाव्यात अकोला जिल्ह्यातील विविध शाळांमधील सुमारे एक हजार विद्यार्थी सहभागी झाले असून विविध प्रशिक्षण सत्रे, प्रात्यक्षिके आणि स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी मेळावा प्रमुख (गाईड विभाग) श्रीमती सुषमा देशमुख, जिल्हा संघटक स्काऊट किरण लहाने, जिल्हा संघटक गाईड श्रीमती जयमाला जाधव, केंद्रप्रमुख विशाल घोगले, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक अविनाश देशमुख तसेच जिल्हा संस्थेचे पदाधिकारी पी. जे. राठोड, उमेश तेलगोटे, पंकज देशमुख, मनोज बगले, सविता शेवतकर, स्मिता डांबलकर, ममता नेमाडे, अशोक राठोड, रमेश जाधव, राजेश सिरसाट, विजय जितकार यांच्यासह कार्यालयीन कर्मचारी संतोष भेंडेकर, ज्योती इंगळे, सुबोध शेगावकर आणि विक्रम काळे यांनी विशेष परिश्रम घेतले.
हा मेळावा विद्यार्थ्यांमध्ये संघभावना, शिस्त आणि नेतृत्वगुण विकसित करण्यास उपयुक्त ठरत असून स्काऊट-गाईड चळवळीचे महत्त्व अधोरेखित करणारा ठरला आहे.
