पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताच्या हॉकी संघानं पेनल्टी शुट आऊटमध्ये
ग्रेट ब्रिटनला उपांत्यपूर्व पराभूत केलं आहे. पेनल्टी शुट आऊटमध्ये
भारतानं ग्रेट ब्रिटनला 4-2 अशा फरकानं पराभूत करत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.
Related News
अकोला शहरातील गुंटेवारी लेआउटचे काम लवकरच सुरू होणार; म.न.पा आयुक्तांचा विश्वास
बोरगाव मंजू येथे दोन गटात तुफान हाणामारी; तक्रार घेताना पोलिसांची एकतर्फी भूमिका?
बाळापूर ब्रेकिंग: मनारखेड दरोडा प्रकरणातील टोळी उखडली; उरळ पोलिसांची मोठी कारवाई
चित्र नगरी कोल्हापूरच्या राज्य सदस्य पदी निलेश जळमकर यांची नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार
अकोला जिल्ह्यात पुन्हा अतिवृष्टीचा इशारा; 4 जुलैपर्यंत हवामान खात्याचा अलर्ट, प्रशासन सतर्क
हिंदी सक्तीचा निर्णय उद्धव ठाकरेंचा, आंदोलनात राज ठाकरेंची उडी – प्रतापराव जाधव यांची टीका
महामार्गावर भीषण अपघात, भला मोठा कंटेनर पलटी; अफवांमुळे लुटीचा प्रयत्न, परिसरात एकच खळबळ!
एलपीजी दरात कपात: कमर्शियल सिलेंडर ५८.५० रुपयांनी स्वस्त
भोपाल कोर्टमधून चित्रपटात शोभेल अशी घटना! शिक्षा ऐकताच आरोपी कोर्टातून पळाला
अकोल्यात सिटी कोतवाली पोलिसांची कारवाई; २४ तासांत दुचाकी चोरटे जेरबंद
मन नदीत आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह; बाळापूर शहरात खळबळ
मतदार यादी अचूकतेसाठी अकोट तहसील कार्यालयात बीएलओ व पर्यवेक्षकांना प्रशिक्षण
दोन्ही संघांनी 1-1 अशी बरोबरी केल्यानं मॅचचा निकाल
पेनल्टी शुट आऊटद्वारे लावण्यात आला. भारताचा गोलकीपर
श्रीजेश यानं जोरदार बचाव केल्यानं आणि भारताच्या हॉकी खेळाडूंनी
पेनल्टी शुट आऊटमध्ये 4 गोलं केल्यानं ब्रिटनला पराभवाचा धक्का बसला.
भारताची उपांत्य फेरीतील लढत आता 6 ऑगस्ट रोजी होणार आहे.
ग्रेट ब्रिटन आणि भारत यांच्यातील मॅचमधील पहिल्या क्वार्टरमध्ये
दोन्ही संघांना एकही गोल करता आला नाही. पहिल्या क्वार्टरनंतर भारताचा
अमित रोहिदास याला रेड कार्ड देण्यात आलं.
त्यामुळं तो बाहेर गेला यानंतर भारताचा कॅप्टन हरमनप्रीत सिंग यानं एक गोल केला.
त्यानंतर ब्रिटनच्या ली मॉर्टन यानं गोल केल्यानं1-1 अशी बरोबरी झाली.
त्यानंतर दोन्ही संघांना गोल करता आला नाही.
भारताच्या बचाव फळीनं दमदार कामगिरी करत ब्रिटनला
पुन्हा एकही गोल करु दिला नाही. पुढच्या दोन्ही क्वार्टरमध्ये भारताच्या बचाव फळीनं
आणि गोल कीपर श्रीजेशनं बचाव करत ब्रिटनचे गोल करण्याचे प्रयत्न हाणून पाडले.
अखेर मॅच पेनल्टी शुट आऊटमध्ये गेली. तिथं भारतानं 4-2 असं ग्रेट ब्रिटनला पराभूत केलं.
Read also: https://ajinkyabharat.com/amit-shahs-protestors-attacked/