केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी चंदीगडमध्ये स्मार्ट सिटी मिशन
अंतर्गत बांधलेल्या २४×७ पाणीपुरवठा प्रकल्पाचे उद्घाटन केले.
यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला.
Related News
Sonam Wangchuk : अखेर 26 दिवसांनी सोनम वांगचूक यांनी उपोषण सोडलं; पंतप्रधान मोदींचा मोठा शब्द, नेमकं काय म्हणाले?
Sonam Wangchuk : दिल्लीतील जं...
Continue reading
CJP Protest : जंतर-मंतरवरून आंदोलन मागे घेणार की लढा सुरूच ठेवणार? अडीच तासांत मोठा फैसला; दिल्लीत घडामोडींना वेग
CJP Protest : NEET पेपरफुटी आण...
Continue reading
Ankita Walawalkar : ‘मला अनफॉलो करा पण...’; CJP आंदोलनावर अंकिता वालावलकरची पोस्ट चर्चेत, म्हणाली- ‘त्यावेळी तुम्ही कुठे होता?’
Ankita Walawalka...
Continue reading
Ghevar Recipe : घरी अगदी सोप्या पद्धतीने बनवा राजस्थानचा प्रसिद्ध घेवर; पटकन जाणून घ्या रेसिपी
Ghevar Recipe : राजस्थान म्हटलं की आपल्या डोळ्यास...
Continue reading
CJP Delhi Protest : मेट्रो बंद… इंटरनेट सेवा ठप्प… आज दिवसभरात काय घडलं? दिल्लीतील CJP आंदोलनाच्या ५ मोठ्या अपडेट्स
CJP Delhi Protest : नीट ...
Continue reading
CJP Delhi Protest : सरकारशी चर्चा नाहीच, आधी फक्त ‘ही’ मागणी पूर्ण करा; CJP ची नवी भूमिका, जंतर-मंतरवर काय घडतंय?
CJP Delhi Protest : दिल्ली...
Continue reading
Air Conditioner : काळा, लाल, निळा नव्हे... AC चा रंग नेहमी पांढराच का असतो? जाणून घ्या ४ महत्त्वाची कारणं
Air Conditioner : उन्हाळा सुरू झाला ...
Continue reading
CJP Protest : अभिजीत दिपके यांनी सोडलं जंतर-मंतर; तापाने फणफण, आंदोलकांची मागितली माफी, म्हणाले- ‘मला आरामाची गरज’
CJP Protest : दिल्लीतील जंतर-मं...
Continue reading
CJP Protest : ‘तसं केलं तर दोघांचं भलं होईल...’; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर रवी जाधव यांची मार्मिक पोस्ट, म्हणाले- ‘तुमचा आवाज देशासाठी आहे’
CJP Prot...
Continue reading
Raj Thackeray-Uddhav Thackeray : पोलिसांचा प्रताप! विद्यार्थ्यांच्या खिशात ड्रग्स टाकण्याची धमकी? राज ठाकरेंचा गंभीर सवाल; २६ जुलैच्या मोर्चाची मोठी घोषणा
Continue reading
Mumbai Police Suspended : विद्यार्थ्याला ‘५० ग्रॅम पावडर’ची धमकी देणाऱ्या पोलिसाचं निलंबन; राज ठाकरेंच्या पत्रकार परिषदेनंतर गृहखात्याचा दणका
Continue reading
Raj Thackeray : राजधानीत शरद पवार-मोदींची भेट; राज ठाकरेंनी अवघ्या ३ शब्दांत उत्तर देत संपवला विषय, म्हणाले- ‘त्यालाच जंतरमंतर म्हणतात’
Raj Thackera...
Continue reading
“विरोधकांना हवं ते म्हणू द्या, तुम्ही चिंता करू नका. २०२९ मध्ये
पुन्हा एकदा एनडीएचे सरकार येईल. मोदी सरकार ५ वर्षे टिकणार नाही
असं म्हणणाऱ्या विरोधकांना मी सांगू इच्छितो की, मोदी सरकार पूर्ण ५ वर्षे टिकेल”
असं अमित शाह यांनी म्हटलं आहे.
“दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईक केला.
काश्मीरमधून कलम ३७० हटवण्याचे कामही पंतप्रधान मोदी यांनी केलं आहे.
तसेच देशातील जनतेने मोदींच्या कार्यावर विश्वास ठेवला आहे.
भविष्यातही लोक त्यांच्या कामावर विश्वास ठेवतील”
असं म्हणत अमित शाह यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडलं आहे.
गृहमंत्र्यांच्या चंदीगड दौऱ्यादरम्यान पोलिसांनी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय पदाधिकारी
आशिष गजनवी यांना ताब्यात घेतलं होतं. गजनवी यांनी दिलेल्या माहितीनुसार,
सकाळी साडेसहा वाजता पोलीस त्यांच्या घरी पोहोचले आणि त्यांना सोबत येण्यास सांगितलं,
पण ते गेले नाहीत. यानंतर पोलिसांनी त्यांना त्यांच्या घरातून बाहेर पडण्यापासून रोखलं.
गजनवी आणि त्यांची टीम नेहमीच गृहमंत्री अमित शाह यांच्या विरोधात निदर्शने करत आहे.
हे लक्षात घेऊन यावेळी त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आलं होतं.
मनीमाजरा पाणीपुरवठा प्रकल्पाचं उद्घाटन अमित शाह यांनी केलं.
यासाठी ७५ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.
याचा फायदा परिसरातील एक लाखाहून अधिक लोकांना होणार आहे.
‘स्मार्ट सिटी मिशन’ अंतर्गत, सतत उच्च दाब पुरवठ्याद्वारे पाण्याचा साठा कमी करून
अपव्यय रोखणे हा प्रकल्पाचा उद्देश आहे.
याशिवाय अमित शाह यांनी अनेक प्रकल्पांचे उद्घाटन केले आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/wrote-a-letter-to-rajnath-singh-demanding-to-stop-giving-arms-to-israel/