केंद्रीय अर्थसंकल्प 2026-2027 मध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ‘आत्मनिर्भर भारत’ला चालना देण्यासाठी अनेक घोषणा केल्या आहेत. यामुळे अर्थव्यवस्थेला बळ मिळण्यासोबतच ग्राहक आणि सामान्य करदात्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. या अर्थसंकल्पातील एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काही वस्तूंवरील कर सवलतींमुळे त्या स्वस्त होणार आहेत, तर काही आयात वस्तूंवरील सूट रद्द किंवा शुल्क वाढवल्यामुळे त्या महाग होणार आहेत.
सरकारने अत्यावश्यक औषधे, इलेक्ट्रिक वाहने (EV), आणि लेदर उत्पादनांसह अनेक वस्तूंवरील टॅरिफ आणि कस्टम ड्युटी कमी केली आहे. दुसरीकडे, लक्झरी वस्तू जसे की महागडी घड्याळे आणि मद्य यांवर अधिक कर लावण्यात येणार असल्याने त्या महागणार आहेत.
स्वस्त होणाऱ्या वस्तूंची यादी
अर्थसंकल्प 2026-2027 मध्ये विमानांचे सुटे भाग, मायक्रोवेव्हचे घटक, अत्यावश्यक औषधे आणि काही आयात वस्तूंवरील कस्टम ड्युटी कमी करण्यात आली आहे, त्यामुळे या वस्तू स्वस्त होणार आहेत.
Related News
जगावर आर्थिक संकटाचे सावट, भारताची अर्थव्यवस्था मात्र मजबूत; Moody’s ने GDP वाढीचा अंदाज 7 टक्क्यांवर वाढवला
जगभरात युद्धजन्य परिस्थिती, वाढते ऊर्जा दर, महागाई आणि आर्थिक अनिश्चित...
Continue reading
रात्री मोबाईल उशाजवळ ठेवून झोपता? कॅन्सरच्या दाव्याआधी जाणून घ्या सत्य; झोपेवर मात्र होऊ शकतो परिणाम
रात्री उशिरापर्यंत मोबाईलवर स्क्रोलिंग, रिल्स पाहणे आणि त्यानंतर फोन उशाजवळ ठे...
Continue reading
क्रूड ऑईल बाबत धडकी भरवणारी बातमी; ब्रेंट क्रूड 100 डॉलर पार, भारताच्या अर्थव्यवस्थेवर दबाव वाढण्याची शक्यता
क्रूड ऑईलने 100 डॉलरचा टप्पा ओलांडला : मध्य पूर्वेतील वाढत्या लष्करी स...
Continue reading
दारू-सिगारेटपेक्षाही धोकादायक ठरू शकते ही गोष्ट; तज्ज्ञांचा इशारा, हळूहळू आरोग्यावर होतो गंभीर परिणाम
आरोग्य विशेष | एकटेपणाचा शरीर आणि मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्य...
Continue reading
भारताची परकीय गंगाजळी ऑल टाइम हाय; 740.803 अब्ज डॉलरवर झेप
जागतिक आर्थिक अनिश्चिततेत भारताची मोठी कामगिरी; परकीय चलनसाठ्यात 11.475 अब्ज डॉलरची वाढ
भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी एक म...
Continue reading
7.8% GDP वरून देशात चर्चा; पंतप्रधान मोदींचं पुन्हा भाष्य, भारत-बेल्जियम सहकार्यावर भर
GDP : भारत दौऱ्यावर आलेले बेल्जियमचे पंतप्रधान बार्ट डी वेवर यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी या...
Continue reading
GDP Growth Row : 7.8% विकासदरावरून काँग्रेस-भाजप आमनेसामने; सरकारने विरोधकांच्या प्रत्येक प्रश्नाला दिले उत्तर
चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतील भारताच्या सकल देशांतर्गत उत्...
Continue reading
आर्थिक वर्ष 2026-27 च्या पहिल्या तिमाहीचे GDP अंदाज जाहीर; उत्पादन, खनन क्षेत्रातील आकडेवारीने वेधले लक्ष
नाममात्र आणि वास्तविक GVA वाढीत मोठी तफावत; GDP मोजणीतील ‘डबल डिफ्लेशन’ प...
Continue reading
आता १० आणि २० रुपयांच्या नोटांमध्ये होणार मोठा बदल; RBI चा प्लास्टिक नोटांबाबत महत्त्वाचा निर्णय, चीन-पाकिस्तान कनेक्शनवरही अट
भारतीय रिझर्व्ह बँकेकडून (RBI) चलनी नोटांच्या संदर्भ...
Continue reading
पेट्रोल-डिझेलसाठी परावलंबित्व संपणार? 2030 पर्यंत 50% गरज शेतकरी, तर 50% EV मधून पूर्ण होईल; पुण्यात मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं वक्तव्य
भाजपच्या कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक पुण...
Continue reading
तुकाराम मुंढेंचा मोठा दणका! टॉयलेटजवळ भाजी, काळे पडलेले पनीर; हॉटेल्सवर FDAची मोठी कारवाई
राज्यात अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत अन्न व औषध प्रशासनाकडून (FDA) मोठी मोहीम राबवण्यात ...
Continue reading
100 टक्के भारतावर टॅरिफ लावणे आत्मघाती! डोनाल्ड ट्रम्प अडचणीत; अमेरिकेतूनच निर्णयाला विरोध
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारताविरोधातील टॅरिफ धोरणामुळे पुन्हा एक...
Continue reading
कमी करण्यात आलेल्या शुल्कामुळे मायक्रोवेव्ह ओव्हन, EV बॅटरी, सोलर पॅनेल आणि विमानांचे सुटे भाग स्वस्त होतील.
मधुमेह आणि कर्करोग रुग्णांसाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांसह एकूण 17 औषधेही स्वस्त होणार आहेत.
तसेच भारतात तयार होणारे स्मार्टफोन आणि टॅबलेट्स यांच्या किंमतीही कमी होण्याची शक्यता आहे. वैयक्तिक वापरासाठी आयात होणाऱ्या काही वस्तूंवरही शुल्क कमी केल्यामुळे त्यांच्या किंमती घटू शकतात.
सीतारामन यांनी लेदर निर्यात वाढवण्यासाठी काही विशिष्ट कच्च्या मालाच्या शुल्कमुक्त आयातीचा प्रस्तावही मांडला आहे. अमेरिकेने लावलेल्या 50% टॅरिफमुळे अडचणीत सापडलेल्या लेदर निर्यातदारांना यामुळे दिलासा मिळणार आहे.
महाग होणाऱ्या वस्तू
लक्झरी घड्याळे आणि आयातित मद्य या वस्तू महाग होणार आहेत. तसेच सिगारेट, बीडी, पान मसाला आणि गुटखा यांसारख्या ‘सिन गुड्स’वरही कर वाढणार असल्याने त्यांची किंमत वाढेल.
कॉफी रोस्टिंग, ब्रूइंग आणि व्हेंडिंग मशीनवरील कर सवलत सरकारने रद्द केली आहे, त्यामुळे ही उपकरणेही महाग होण्याची शक्यता आहे.
काही खतांवरही परिणाम होणार असून अमोनियम फॉस्फेट किंवा अमोनियम नायट्रो-फॉस्फेटच्या आयातीवरील शुल्क सवलत रद्द करण्यात आली आहे. ही रसायने खत आणि मिश्र खतांच्या निर्मितीत वापरली जातात, त्यामुळे खतांच्या किंमती वाढू शकतात.
आयातित टेलिव्हिजन उपकरणे, कॅमेरे आणि चित्रपट निर्मितीसाठी लागणारी उपकरणेही महाग होण्याची शक्यता आहे. तसेच परदेशातून आयात होणारी फोटोग्राफी, फिल्मिंग आणि साउंड रेकॉर्डिंग उपकरणेही महाग होऊ शकतात.
read also : https://ajinkyabharat.com/stock-market-live-after-budget-2026-sensex-nifty-on-the-way-to-recovery-after-decline/