स्थानिक गुन्हे शाखेकडून मोठी कारवाई : 6 लाख 69 हजार 202 रुपयांचा चोरीचा मुद्देमाल जप्त
स्थानिक गुन्हे शाखेने पोलीस स्टेशन खदान येथे दाखल गुन्ह्याचा यशस्वी तपास करत तब्बल ₹ 6,69,202/- किमतीचा चोरीचा मुद्देमाल जप्त केला आहे. दिनांक 29 जानेवारी 2026 रोजी पोलीस स्टेशन खदान येथे अप. क्र. 291/26, कलम 331(4), 305 (3) BNS नुसार गुन्हा नोंदवण्यात आला होता.
सदर तपास स्थानिक गुन्हे शाखेने करत आरोपी सैय्यद फैजान सैय्यद करिमोद्दीन (वय 18 वर्षे 6 महिने) यास ताब्यात घेतले. विचारपूस दरम्यान आरोपीने हा गुन्हा त्याचे साथीदार शेख जुनेद उर्फ दानिश शेख हनीफ व अब्दुल राकिब अब्दुल अलीम यांच्या सहकार्याने केल्याची कबुली दिली.
Related News
तपासादरम्यान आरोपीकडून जप्त करण्यात आलेला चोरीचा मुद्देमाल पुढीलप्रमाणे आहे –
2 सोन्याच्या बांगड्या
1 सोन्याची चैन
2 सोन्याच्या अंगठ्या
1 चांदीची जोड चैनपट्टी
रोख रक्कम ₹ 22,280/-
1 Redmi कंपनीचा मोबाईल
1 Apple कंपनीचे इअरबूड्स
गुन्ह्यात वापरलेली 1 बजाज मोटारसायकल
सदर मुद्देमाल आणि आरोपीस पुढील कायदेशीर कारवाईसाठी पोलीस स्टेशन खदानच्या ताब्यात देण्यात आले.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्री अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक श्री बी. चंद्रकांत रेड्डी, तसेच पोलीस निरीक्षक (स्थानिक गुन्हे शाखा, अकोला) श्री शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली गेली. कार्यवाही API विजय चव्हाण, पोउपनि गोपाल जाधव, पोउपनि बोडखे, HC माजीद, वसीम, महेंद्र मलीये, किशोर सोनोने, एजाज, रवी खंडारे, हसन, अशोक, दीपके, श्रीकांत पातोंड यांच्या पथकाने यशस्वीरीत्या केली.
read also : https://ajinkyabharat.com/celebrating-republic-day-at-hiwarkhed-police-station/
