अकोट: अकोला जिल्ह्यातील सगळ्यात मोठा तालुका असलेले अकोट येथील ग्रामीण रुग्णालय पायाभूत सुविधांचा अभाव दर्शवत आहे. गेल्या काही दिवसांपासून रुग्णांना येथे पुरवण्यात येत असलेल्या अनेक सुविधा बंद पडल्याचे चित्र दिसत आहे. या सुविधा त्वरित सुरू करण्याची गरज असल्याचे नागरिकांचे मत आहे.
रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता असल्यामुळे अनेक रुग्णांना अकोला येथे रेफर करावे लागते. ग्रामीण भागातून सर्पदंश, विषबाधा, हृदयविकाराचा झटका, अर्धांगवायू तसेच इतर गंभीर आजारांमुळे रुग्ण येत असतात, पण पायाभूत सुविधांचा अभावामुळे येथे उपचार होऊ शकत नाहीत. काही रुग्ण या परिस्थितीत दगावतात, तर काही अकोला जाऊ देखील शकत नाहीत. १०८ रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांना प्रायव्हेट रुग्णवाहिकेचा खर्च सहन करावा लागतो.
अधिकारी आणि लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
महाराष्ट्र आरोग्य विभागाने रुग्णालयासाठी सुविधा दिल्या असल्या तरी, जिल्हा चिकित्सक तसेच स्थानिक अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे रुग्णालयाची परिस्थिती बिकट झाली आहे. शहर व ग्रामीण भागातील गरीब रुग्ण उपचारासाठी येथे येतात, पण अपुरी स्टाफमुळे वेळेवर उपचार होत नाहीत. नागरिकांचे मत आहे की, रुग्णालयात पूर्ण डॉक्टर उपलब्ध झाल्यास रुग्णांना दिलासा मिळेल.
Related News
Pune News : बावधनमध्ये खड्ड्यांचा कहर; पाण्याने भरलेल्या रस्त्यांतून वाट काढताना वाहनचालकांची दमछाक
‘पुणे तिथे काय उणे!’ असं मिश्कीलपणे म्हटलं जातं. मात्र सध्या पुणेकरांना विकासा...
Continue reading
पिंपरीत भटक्या कुत्र्यांचा भीषण हल्ला; 5 वर्षीय चिमुरडीला 46 सेकंद घेरलं, शरीरावर 90 टाके
Pimpri Chinchwad Dog Attack : पिंपरी-चिंचवड शहरातून भटक्या कुत्र्यांच्या दहशतीची धक्कादाय...
Continue reading
शहापूरच्या खड्ड्याने घेतला जवानाचा बळी; ‘खड्डा दिसला नाही का?’ पोलिसांच्या वक्तव्याचा कुटुंबीयांचा गंभीर आरोप
मुंबई-नाशिक महामार्गावरील खड्ड्यामुळे TDRF जवान व...
Continue reading
नाशिकमध्ये खड्ड्यांच्या मुद्द्यावरून महापौर दालनात राडा; ठाकरे-शिंदे गटाचे नगरसेवक आमनेसामने, राजकीय वातावरण तापले
Nashik Political News : रस्त्यावरील खड्ड्यांवरून...
Continue reading
लातूरमध्ये शाळकरी मुलींचा पाठलाग? संशयित तरुणाला नागरिकांनी पकडले; विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
लातूर : शिक्षणाचे केंद्र म्हणून संपूर्ण राज्यात...
Continue reading
Kalyan-Dombivli News: पहिल्याच पावसात कल्याण-डोंबिवलीची दैना! 5 धक्कादायक वास्तव उघड, नागरिकांचे मोठे नुकसान
कल्याण : यंदाच्या पावसाळ्याच्या सुरुवातीलाच कल्याण-डों...
Continue reading
कल्याणमध्ये हृदयद्रावक घटना! खाऊ आणायला गेलेल्या 24 वर्षीय महिलेचा विजेच्या शॉकने मृत्यू; पोलिसावर 'खर्चा-पाणी' मागणीचा गंभीर आरोप
कल्याण: कल्याण पूर्वेतील हनुमान ...
Continue reading
डोंबिवलीत भीषण पाणी संकट! 3 महिने थेंबभर पाणी नाही; शेकडो महिलांचा आक्रमक हंडा मोर्चाडोंबिवली : पावसाळा उशिरा सुरू झाल्यामुळ...
Continue reading
मुंबईत पांढऱ्या पट्ट्यांवरून नवा वाद! आंदोलन करणाऱ्या मनसैनिकांवर गुन्हा; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
मुंबईच्या गिरगाव परिसरात फुटपाथवर मारण्यात आलेल्या पांढऱ्या पट्ट्यांवरू...
Continue reading
जालन्यात मृतदेहाची अमानुष विटंबना; 15 दिवसांपूर्वी उद्घाटन झालेली रुग्णवाहिका असताना कचऱ्याच्या गाडीतून नेला मृतदेह
जालना जिल्ह्यातील परतूर शहरातून माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्...
Continue reading
धक्कादायक खुलासा! पुण्यातील यात्रेत विकल्या गेलेल्या बेडशीटवर ‘Made in Pakistan’; महिलेच्या व्हिडिओने उडवली खळबळपुणे जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवड परिसरातून एक धक्कादायक आणि चर्चेच...
Continue reading
राज्यपालांच्या ताफ्यासाठी रस्ता रोखला; गर्भवती पत्नी कारमध्ये तडफडत असताना पतीचा संतप्त ठिय्या, VIDEO मुळे VIP संस्कृतीवर पुन्हा प्रश्नचिन्ह
बेंगळुरू: देशातील व्हीआयपी संस्कृती आण...
Continue reading
रुग्णांचा संताप; तातडीने उपाययोजनांची मागणी
ग्रामीण रुग्णालयास उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळाल्यानंतरही वैद्यकीय स्टाफ वाढवण्यात आलेला नाही. तपासणीसाठी लागणारी मशीनरी बंद असल्यामुळे केवळ औषधोपचार देऊन रुग्णांची तपासणी केली जात आहे. यामुळे नागरिकांमध्ये आरोग्य प्रशासनाविरुद्ध संताप वाढला आहे.
जिल्हा आरोग्य यंत्रणा आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी तातडीने लक्ष देऊन अपुरी स्टाफ भरती करावी आणि बंद पडलेल्या मशीनरी त्वरित सुरू करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.
प्रतिसाद
डॉ. मंगेश दातीर, वैद्यकीय अधीक्षक, अकोट:
“ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता आहे. परिणामी रुग्णांना अकोला रेफर करावे लागते. तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध झाल्यास रुग्णांचे उपचार येथेच होऊ शकतील.”
गजानन पाटील पुंडकर, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष, अकोला:
“ग्रामीण रुग्णालयात लसींचा तुटवडा असतो, रुग्णांना अकोला रेफर करावे लागते. अकोट हा सगळ्यात मोठा तालुका असून येथे मूलभूत सुविधा नसल्यास ग्रामीण रुग्णालय शोभेची वस्तू आहे का? याकडे वरिष्ठांनी गांभीर्याने लक्ष द्यावे.”
read also : https://ajinkyabharat.com/5-reasons-vitamin-b12-hair-loss-results-in-darker-hair-color/