व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 8.50 रुपयांनी वाढ

घरगुती मात्र स्थिर

LPG गॅस सिलेंडर सर्वांच्याच जिव्हाळ्याचा विषय.

देशातील बहुतेक नागरिकांचे पोट त्यावर अवलंबून असते.

Related News

त्यामुळे त्याच्या किमतींबाबत सर्वांनाच उत्सुकता असते.

शिवाय त्या वाढल्या किंवा कमी झाल्या तर त्याचा महागाईवर थेट परिणाम होतो.

असाच परिणाम आजपासून होणार आहे.

या वर्षातील ऑगस्ट महिन्याची सुरुवात आजपासून झाली आहे

आणि आजपासून तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक LPG गॅस सिलेंडरच्या किमती

8.50 रुपयांनी वाढवल्या आहेत.

दरम्यान, 14 किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरची किंमत कायम आहे.

व्यावसायिक सिलेंडर 19 किलो वजनाचे असतात.

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वेबसाइटनुसार,

19 किलोच्या एलपीजी सिलेंडरची किंमत आता दिल्लीमध्ये 1652.50 रुपये आहे,

जी 1646 रुपयांवरून – 6.50 रुपयांनी वाढली आहे.

कोलकातामध्ये, किंमत 8.50 रुपयांनी वाढली आहे,

ज्यामुळे किंमत 1764.50 रुपये झाली आहे.

मुंबईत नवीन किंमत 1605 रुपये आणि चेन्नईमध्ये 1817 रुपये आहे.

दरम्यान, या दरवाडीविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारने विविध वस्तू, सेवांच्या किमती कमी केल्या.

मात्र, आता निवडणुका संपल्या सरकार स्थिर झाले.

त्यामुळे आता त्यांना जनतेचे काहीही पडले नाही.

परिणामी हवे तेव्हा हवे तसे वाट्टेल तेवढ्या किमती वाढविण्याचे उद्योग सुरु आहेत.

केंद्र सरकारने महागाई कमी करण्यासाठी काहीतरी परयत्न करायला हवेत,

अशी भावना नागरिकांमधून व्यक्त होऊ लागली आहे.

Related News