दिल्लीमधील जुन्या राजेंद्र नगरमधील आयएएस कोचिंग सेंटरच्या तळघरात
पावसाचं पाणी शिरून यूपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या
तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. देशभरात या घटनेचे तीव्र पडसाद उमटले.
Related News
गुलजारपुरा स्मशानभूमी मोजते अखेरच्या घटका
भारताला जपानकडून बुलेट ट्रेनची भेट! मुंबई-अहमदाबाद उच्चगती रेल्वे
अकोल्यात केंद्र सरकारविरोधात काँग्रेसचे तीव्र आंदोलन!
मेरठमध्ये धक्कादायक प्रकार : तरुणाची २५ वर्षांनी मोठ्या विधवा महिलेशी फसवून लग्न
राजस्थानमध्ये भीषण अपघात; वरात घेऊन जाणारी बस आणि ट्रकची समोरासमोर धडक….
अकोल्यात पाणी प्रश्न पेटला; शिवसेनेचा जलप्रदाय विभागात घागर मोर्चा, तोडफोड
कोल्हापुरात फुटबॉल सामन्यादरम्यान आयोजकांना पाच हजारांचा दंड
राजकोटमध्ये अपघात; ४ जणांचा मृत्यू, संतप्त नागरिकांचा रस्तारोको
जिल्हा परिषद अकोला : अधिकारी–कर्मचारी, जनतेत तीव्र नाराजी
सुदैवाने जीवितहानी टळली….
मुर्तीजापुरात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांनी घेतली गस्त मोहीम हाती
पारंपरिक शेती करताना शेतकऱ्यांना अनेक अडचणी
दरम्यान, या मुद्द्यावरून संसदेतही मोठा गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं.
देशाच्या राजधानीत घडलेली घटना दुर्दैवी असल्याचं खासदारांनी म्हटलं आहे.
सत्ताधारी व विरोधी पक्षांच्या खासदारांनी दिल्लीमधील कोचिंग सेंटर्समध्ये शिकणाऱ्या,
स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा
राज्यसभेत उपस्थित केला. दरम्यान, उपराष्ट्रपती तथा राज्यसभेचे सभापती
जगदीप धनखड यांनी कोचिंग सेंटर्सच्या व्यापारीकरणावर जोरदार टीका केली.
ते म्हणाले, कुठलंही वर्तमानपत्र उघडल्यावर त्यामध्ये
अशा कोचिंग सेंटर्सच्या कित्येक जाहिराती दिसतात.
वर्तमानपत्रांमध्ये पानभर जाहिराती दिल्या जातात, पहिल्या, दुसऱ्या,
तिसऱ्या पानावर भल्या मोठ्या जाहिराती दिसतात.
या जाहिरातींवर कोट्यवधी रुपये खर्च केले जातात.
त्यांच्याकडे इतके पैसे येतात कुठून? काही लोकांनी धंदा सुरू केला आहे.
कोचिंग सेंटर्स हा एक प्रकारचा मोठा धंदा झालाय.
मुलं आपली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी या शहरात येतात आणि त्यांचे पालक
या कोचिंग सेंटर्सवाल्यांना लाखो रुपये देतात. सभापती म्हणाले,
“मी सभागृहातील सर्व सदस्यांकडे आग्रह करतो की प्रत्येकाने यावर उपाय सुचवा.
आपल्या भारताला कुशल तरुणांची आवश्यकता आहे.
मात्र हे कोचिंग सेंटर्सवाले लोक आपल्या तरुणांना एका मर्यादित
साच्यात टाकू पाहतायत. राजधानीतील कोचिंग सेंटर्स एखाद्या गॅस चेंबरपेक्षा कमी नाहीत.
राजेंद्र नगरमध्ये घडलेली घटना वेदना देणारी आहे.
जुन्या राजेंद्र नगर भागात घडलेल्या या दुः खद घटनेवर
आपत्कालीन चर्चा घेण्याच्या मागणीला सभापती धनखड यांनी सहमती दर्शवली.
Read also: https://ajinkyabharat.com/ajit-pawar-gatala-supreme-court-notice/