विधानसभेसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा पहिला उमेदवार जाहीर

जागावाटपाआधीच

जागावाटपाआधीच मोठी घोषणा

लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीची

रणधुमाळी सुरु झाली आहे. काही दिवसांपूर्वी

Related News

राष्ट्रवादी शरद पवार गटाने विधानसभा निवडणुकीसाठी रोहित पाटील

आणि अमित भांगरे यांच्या नावाची घोषणा केली.

या पाठोपाठ आता अजित पवार गटाकडून विधानसभेसाठी जागावाटपाआधीच

पहिल्या उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे

दोन दिवसीय नाशिक दौऱ्यावर आहेत.

विधानसभेच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाकडून नाशिक जिल्ह्यातील

विविध मतदारसंघांचा आढावा घेतला जात आहे.

आज दिंडोरी विधानसभा मतदारसंघाचा आढावा सुनील तटकरे यांच्याकडून घेण्यात आला.

यावेळी त्यांनी दिंडोरी मतदारसंघासाठी उमेदवाराची मोठी घोषणा केली आहे.

सुनील तटकरे यांनी दिंडोरीचे विद्यमान आमदार नरहरी झिरवाळ यांच्या नावाची घोषणा केली आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/statue-of-mahatma-gandhi-unveiled-in-tokyo-by-foreign-ministers/

Related News