Explainer : ठाकरेंचा किल्ला ढासळला, पवारांचाही करिश्मा फिका; Mahapalika निवडणुकांत पराभव कसा झाला?
महाराष्ट्रातील 29 Mahapalika च्या निवडणुकांचे निकाल जाहीर होताच राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाल्याचं स्पष्ट झालं आहे. गेल्या महिनाभरापासून ज्या निवडणुकांकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं, त्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने निर्विवाद वर्चस्व मिळवत एकतर्फी बाजी मारली, तर दुसरीकडे ठाकरे बंधू, तसेच शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही गटांना मतदारांनी स्पष्ट नकार दिला.
मुंबईसह बहुतांश Mahapalikaमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. विशेष म्हणजे, राज आणि उद्धव ठाकरे यांची 20 वर्षांनंतरची युती, तसेच पवार काका–पुतण्यांचं मर्यादित मनोमिलन असूनही त्याचा कोणताही ठोस राजकीय फायदा झाला नाही. उलट, या निवडणुकांनी ठाकरे आणि पवार या दोन्ही राजकीय घराण्यांच्या प्रभावाला मोठा धक्का दिल्याचं चित्र समोर आलं आहे.
मुंबईसह 29 Mahapalikaत भाजपचा दबदबा
15 जानेवारीला मतदान आणि त्यानंतर जाहीर झालेल्या निकालांमध्ये मुंबई Mahapalikaसह बहुतेक महापालिकांमध्ये भाजपचं वर्चस्व स्पष्टपणे दिसून आलं. मुंबई Mahapalika निवडणूक ही केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक नव्हती, तर ती सर्व पक्षांसाठी प्रतिष्ठेची लढाई ठरली होती.
Related News
मुंबईत भाजपने 89 जागा मिळवत सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला 65 जागांवर समाधान मानावं लागलं, तर राज ठाकरे यांच्या मनसेला अवघ्या 6 जागा मिळाल्या. ठाकरे बंधूंच्या युतीमुळे मोठी राजकीय उलथापालथ होईल, असा अंदाज बांधला जात होता. मात्र प्रत्यक्ष निकालांनी हे सर्व अंदाज फोल ठरवले.
ठाकरेंचा किल्ला का ढासळला? – कारणांचा मागोवा
1) मर्यादित प्रचार, मुंबईपुरताच फोकस
जुलै महिन्यात मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर ठाकरे बंधू 20 वर्षांनंतर एकत्र आले. त्यानंतर Mahapalika निवडणुकांसाठी त्यांनी युती जाहीर केली. सुरुवातीला यामुळे मराठी मतदारांमध्ये उत्साह निर्माण झाला. मात्र हा उत्साह प्रचारात रूपांतरित करण्यात ठाकरे बंधू अपयशी ठरले.
राज्यात एकूण 29 Mahapalikaच्या निवडणुका असताना, त्यांचा संपूर्ण फोकस मुंबई, नाशिक आणि थोडाफार ठाण्यावरच राहिला. मुंबई, नाशिक आणि ठाण्यात प्रत्येकी एक संयुक्त सभा झाली, मात्र इतर महापालिकांमध्ये त्यांनी सभा घेतल्याच नाहीत. परिणामी, त्या भागातील मतदारांपर्यंत ठाकरे बंधू पोहोचू शकले नाहीत.
2) सभांऐवजी शाखा भेटींचा प्रयोग फसला
मुंबईत मोठ्या प्रचारसभांऐवजी शाखा भेटींवर भर देण्याचा निर्णय ठाकरेंनी घेतला. मात्र निवडणुकीच्या काळात मोठ्या सभांचा प्रभाव अधिक असतो. शाखा भेटी या मर्यादित कार्यकर्त्यांपुरत्याच राहिल्या आणि व्यापक मतदारांपर्यंत संदेश पोहोचू शकला नाही. परिणामी, हा निर्णय ठाकरेंच्या अंगलट आला.
3) शिवसेनेतील फूट आणि नगरसेवकांची गळती
तीन वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत शिवसेनेतून बाहेर पडल्याने पक्षाचे दोन गट झाले. या फुटीनंतर आजपर्यंत 40 ते 50 नगरसेवकांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी दिली. याचा मोठा फटका संघटनात्मक पातळीवर बसला. मजबूत स्थानिक नेतृत्व नसल्याने अनेक प्रभागांत ठाकरे गट कमकुवत ठरला.
4) नव्या चेहऱ्यांचा अतिरेक
या निवडणुकीत ठाकरे गटाने अनेक नव्या आणि अपरिचित चेहऱ्यांना उमेदवारी दिली. मात्र हे उमेदवार मतदारांमध्ये फारसे परिचित नव्हते. स्थानिक पातळीवर पकड नसल्याने त्याचा थेट परिणाम मतदानावर झाला.
5) शिवसेना विरुद्ध शिवसेना – मतांची विभागणी
अनेक ठिकाणी शिवसेना ठाकरे गट विरुद्ध शिवसेना शिंदे गट अशी थेट लढत झाली. यामुळे मराठी मतांचे मोठ्या प्रमाणात विभाजन झाले. जर ही लढत फक्त शिवसेना विरुद्ध भाजप अशी झाली असती, तर चित्र वेगळं असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पवार काका–पुतण्यांचा करिश्मा का फिका पडला?
1) महायुती असूनही एकत्र न लढण्याचा फटका
महायुतीत असतानाही अजित पवारांनी भाजपसोबत न लढण्याचा निर्णय घेतला, जो त्यांच्यासाठी अतिशय महागात पडला. विशेषतः पुण्यासारख्या भाजपच्या बालेकिल्ल्यात हा निर्णय घातक ठरला.
2) कधी वेगळे, कधी एकत्र – मतदारांचा संभ्रम
काही ठिकाणी अजित पवार आणि शरद पवार एकत्र लढले, तर काही ठिकाणी वेगळे. पक्षफुटीनंतर एकीकडे कोर्टात वाद सुरू असताना, दुसरीकडे निवडणुकीसाठी एकत्र येणं मतदारांना रुचलं नाही. “काका–पुतणे आपल्याला गोंधळात टाकत आहेत” अशी भावना मतदारांमध्ये निर्माण झाली.
3) शरद पवारांचा प्रचारात अभाव
या संपूर्ण निवडणुकीत शरद पवार प्रचारात जवळपास पूर्णपणे अनुपस्थित होते. एकही मोठी सभा नाही, दौरे नाहीत, पत्रकार परिषदाही नाही. त्यामुळे मतदारांपर्यंत राष्ट्रवादीचा संदेश पोहोचू शकला नाही.
4) मनोमिलन केवळ कागदावरच
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याचं चित्र फारसं कुठेच दिसलं नाही. अवघ्या एक-दोन संयुक्त सभा झाल्या. त्यामुळे मतदारांमध्ये संभ्रम कायम राहिला.
5) अजित पवारांचे वादग्रस्त वक्तव्य आणि अपूर्ण आश्वासनं
अजित पवारांनी प्रचारादरम्यान अनेक घोषणा केल्या. मात्र मुख्यमंत्र्यांनीच त्या आश्वासनांचा फोलपणा उघड केल्याने त्यांची विश्वासार्हता कमी झाली. शिवाय काही वादग्रस्त वक्तव्यांमुळे त्यांची प्रतिमा डागाळली.
बदलती राजकीय समीकरणं
या Mahapalikaनिवडणुकांनी एक गोष्ट स्पष्ट केली आहे राज्यातील राजकीय सत्ता-समीकरणं वेगाने बदलत आहेत. भाजपने संघटनात्मक ताकद आणि आक्रमक प्रचाराच्या जोरावर वर्चस्व मिळवलं, तर ठाकरे आणि पवार या पारंपरिक प्रभावी घराण्यांना आत्मपरीक्षणाची गरज निर्माण झाली आहे.
आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे निकाल धोक्याची घंटा ठरू शकतात. जर वेळेत रणनीती बदलली नाही, तर भविष्यातही हेच चित्र कायम राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.
read also:https://ajinkyabharat.com/mi-vs-up-wpl-2026-mumbai-indiansquad/
