अकोला महानगरपालिका निवडणूक निकाल: प्रभाग क्रमांक 19 मध्ये भाजपाचे वर्चस्व, राष्ट्रवादीला एक जागा
अकोला महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 19 मध्ये भाजपाने (भाजपा) जोरदार कामगिरी करत तीन जागांवर विजय मिळवला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ला एक जागा मिळाली आहे.
प्रभाग क्रमांक 19 मधून
धनंजय धबाले (अ) – भाजप
Related News
गजानन सोनोने (ब) – भाजप
योगिता पावसाळे (क) – भाजप
हे तिन्ही उमेदवार विजयी झाले आहेत.
तर ड प्रभागातून पूजा गावंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) कडून विजय संपादन केला आहे.
या निकालामुळे प्रभाग क्रमांक 19 मध्ये भाजपाचे वर्चस्व स्पष्ट झाले असून, राष्ट्रवादी काँग्रेसला एकमेव जागेवर समाधान मानावे लागले आहे. या विजयानंतर भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले जात आहे.
