बायडेन यांनी निवडणुकीतून माघार घ्यावी !

जो बायडेन

 ज्यो बायडेन यांच्या प्रकृतीस्वास्थ्यतेबाबत दररोजच उलट सुलट बातम्या

प्रसिद्ध व्हायला लागल्यामुळे अध्यक्षीय निवडणुकीतून त्यांनी माघार घ्यावी,

अशी मागणी पुन्हा एकदा व्हायला लागली आहे.

Related News

बायडेन यांच्या डेमोक्रॅटिक पक्षातील नेत्यांनी पुन्हा ही मागणी लावून धरली आहे.

विशेषतः बायडेन यांना कोविड-१९ ची लागण झाल्याचे

निष्पन्न झाल्यावर तर या मागणीला अधिकच जोर चढला आहे.

डेमोक्रॅटिक पक्षाचे प्रभावशाली नेते आणि कॅलिफोर्नियाचे प्रतिनिधी

ऍडम शिफ यांनी जाहीरपणे अध्यक्ष बायडेन यांना निवडणुकीच्या शर्यतीतून माघार घेण्यास सांगितले आहे.

त्यांनी त्यांच्या वयामुळे उद्भवलेल्या आरोग्यविषयक समस्यांमुळे

पुन्हा निवडणूक लढवण्याची मोहीम संपवली तर ते देश आणि डेमोक्रॅटिक पक्षासाठी चांगले होईल,

असे आणखी एक ज्येष्ठ नेते आणि सिनेटमधील बहुसंख्यांकांचे नेते

आणि काँग्रेसमधील सर्वात ज्येष्ठ डेमोक्रॅट चक शूमर यांनी बायडेन यांना सांगितले आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/upsc-chairman-manoj-sonis-resignation/

Related News