अकोल्यातील शासकीय रुग्णालयातील शवविच्छेदनगृहातील फ्रीजर बंद!

मृतदेह

मृतदेह कुजण्याचा धोका

अनोळखी तसेच अपघातग्रस्त मृतदेहांची मरणानंतरही अवहेलना

आकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयातील

Related News

शवविच्छेदनगृहातील फ्रीजर बंद असल्याने या ठिकाणी ठेवण्यात येत असलेल्या

अनोळखी मृतदेहांसह अपघातग्रस्त व घातपात प्रकरणातील मृतदेह

कुजण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे.

शवविच्छेदनगृहातील फ्रीजरला असलेल्या विद्युत कनेक्शनमध्ये

मोठा तांत्रिक बिघाड असल्याने हे फ्रीजर बंद आहेत.

त्यामुळे अनोळखी मृतदेहांची मरणानंतरही अवहेलना सुरूच असल्याचे वास्तव आहे.

जिल्ह्यातील कोणत्याही पोलिस ठाण्याच्या हद्दीत अनोळखी मृतदेह आढळल्यानंतर

तसेच उपचारादरम्यान अनोळखी इसमाचा मृत्यू झाल्यानंतर

पोलिसांची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत हे मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय

तथा सर्वोपचार रुग्णालयातील शवविच्छेदनगृहात ठेवण्यात येतात.

या ठिकाणी १२ मृतदेह ठेवण्यासाठी अद्ययावत व्यवस्था करण्यात आली आहे.

मात्र, गत काही दिवसांपासून येथील फ्रीजर बंद असल्याने

मृतदेह ठेवण्यास मोठ्या अडचणी प्रशासनासमोर निर्माण झालेल्या आहेत.

Read also: https://ajinkyabharat.com/chengarachengri-like-situation-at-mumbai-airport/

Related News