‘लाडकी बहीण’सोबत ‘लाडका भाऊ’ योजना आणा!

शेतकरी

शेतकरी कर्जमुक्त करा, उद्धव ठाकरेंची मागणी

राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा,

Related News

विधानसभा निवडणुकीपूर्वी त्याची अंमलबजावणी करा.

त्याचसोबत लाडकी बहीण योजना आणतायेत तसा लाडका भाऊ योजना आणा.

महिला-पुरुष भेदभाव करू नका अशी मागणी

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवालय येथे पत्रकार परिषद घेत केली आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले की,

राज्यात नव्हे तर देशात एकमेव शेतकरी असेल जो हेलिकॉप्टरने शेतीत जातो

आणि पंचतारांकित शेती करतो.

विशेषतः अमावस्येला वेगळे पिक घेतात हे आम्ही ऐकलंय असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

यांच्यावर घणाघात करत राज्यात सरासरी ९ शेतकरी आत्महत्या करतायेत.

१० हजार २२ कोटी नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळाली नाही.

घोषित केलेली आकडेवारी कागदावरच, प्रत्यक्षात शेतकऱ्यांना मदत नाही.

पीक विम्याचे पैसे नीट मिळत नाही. चित्रविचित्र गोष्टी राज्यात सुरू आहेत.

त्यामुळे डबल इंजिन सरकार आलंय,

कसंबसं एनडीएचं सरकार दुर्दैवाने आपल्या देशात परत आलंय.

नागपूरच्या पहिल्याच अधिवेशनात कुणीही न मागता मी २ लाखांची पीक कर्जाची रक्कम माफ केली होती.

त्याप्रमाणे तात्काळ शेतकऱ्यांची कर्जमुक्ती जाहीर करून

निवडणुकीच्या आत त्याची अंमलबजावणी करा असं त्यांनी म्हटलं.

तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या काळातील कर्जमुक्तीची घोषणा अद्याप पूर्ण झाली नाही.

नुसत्या घोषणा करू नये. अंमलबजावणी करा आणि मग निवडणुकीला सामोरे जा.

मंत्र्यांना इतर कामे बरीच आहेत. शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला कुणी तयार नाही.

जनतेचा वाली कोणी राहिला नाही.

ज्याप्रमाणे मध्य प्रदेशात लाडली बहना अशी योजना आहे

तशी राज्यात लाडकी बहीण योजना आणतायेत.

मुली मुलांमध्ये भेदभाव करू नका, मुलींप्रमाणेच मुलांनाही योजना आणा.

पोलीस भरतीत साडे सतरा हजार जागांसाठी लाखो अर्ज आलेत.

भरतीसाठी आलेल्या तरुणांना राहण्याची व्यवस्था नाही.

अनेक ठिकाणी सोयीसुविधा नाहीत.

बेकारी वाढत चालली आहे असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला.

Read also: https://ajinkyabharat.com/sam-pitroda-once-again-appointed-as-overseas-congress-chief/

Related News