कृषी शिक्षणाला नवे बळ! डॉ. विलास खर्चे महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीचे नवे कुलगुरू

डॉ. विलास खर्चे

अकोला – राज्यातील कृषी शिक्षण व संशोधन क्षेत्रात महत्त्वपूर्ण घडामोड घडत असून, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ , अकोला येथील माजी संशोधन संचालक डॉ. विलास काशिनाथ खर्चे यांची महात्मा फुले कृषी विद्यापीठ (एमपीकेव्ही), राहुरी, जि.अहमदनगर येथे कुलगुरू म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या संदर्भातील अधिकृत आदेश महाराष्ट्र कृषी विद्यापीठे कायदा 1983 मधील सुधारित कलम 17 अन्वये माननीय कुलपतींकडून जारी करण्यात आला आहे.डॉ.खर्चे सध्या कोठारी वाटिका क्र. 2, मलकापूर रोड, अकोला येथे वास्तव्यास असून, कृषी संशोधन क्षेत्रातील त्यांचा दीर्घ अनुभव, कामाचा व्यासंग आणि शेतकरी हितासाठी केलेल्या कामगिरीची दखल घेत त्यांची राज्यातील अग्रगण्य कृषी विद्यापीठात पाच वर्षांच्या कालावधीसाठी कुलगुरू म्हणून निवड करण्यात आली.

पंददेशमध्ये संशोधन संचालक म्हणून कार्यरत असताना त्यांनी आधुनिक शेती पद्धतींवर संशोधन, तांत्रिक नवप्रयोगांची अंमलबजावणी, हवामान-आधारित संशोधन प्रकल्प आणि शेतकरी-केंद्रित उपक्रम
यांना मोठी गती दिली होती. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक नाविन्यपूर्ण संशोधन प्रकल्प राबवले गेले व कृषी क्षेत्रात शाश्वत प्रगतीची दिशा निर्माण झाली.डॉ.खर्चे यांच्या नियुक्तीमुळे एमपीकेव्ही, राहुरी येथे संशोधनाला नवी गती, कृषी शिक्षणात आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिक वापर,आणि विस्तार सेवांमध्ये परिणामकारकता
येत असल्याचा तज्ज्ञांचा विश्वास आहे.

नियुक्ती आदेशानुसार त्यांचा कार्यभार स्वीकारल्याच्या दिवसापासून त्यांचे अधिकार व जबाबदाऱ्या लागू होणार असून, विद्यापीठाच्या आगामी कार्ययोजनेला नवे बळ आणि दिशा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.कृषी क्षेत्रातील अनुभवी व समर्पित नेतृत्व म्हणून डॉ. खर्चे यांच्या नियुक्तीचे कृषी शिक्षण क्षेत्रात सर्वत्र स्वागत होत आहे.

Related News

read also : https://ajinkyabharat.com/information-about-chief-minister-majhi-school-sundar-school-initiative/

Related News