सावली वनपरिक्षेत्रात अवैध उत्खननाला आळा घालण्यासाठी वनविभागाने मोठी मोहीम राबवत कढोली परिसरातून जेसीबीसह तीन ट्रॅक्टर जप्त केले. दि. 21 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री सुमारे 8 वाजताच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
व्याहाड उपक्षेत्रात रात्रगस्तीदरम्यान क्षेत्र सहाय्यक अनंत राखुंडे आणि वनरक्षक महादेव मुंढे यांनी मौजा कढोली येथील गट क्रमांक 144 मधील वनभूमीत अवैध उत्खनन सुरू असल्याचे निदर्शनास आणले. तत्काळ पथकाने छापा टाकत जेसीबी आणि तीन ट्रॅक्टर ताब्यात घेतले.
या प्रकरणी भारतीय वन अधिनियम 1927 अंतर्गत कलम 33(1)(E),कलम 35(1)(G),नुसार वन गुन्हा क्रमांक 204/212852/2025 नोंदविण्यात आला.
Related News
Khavdya Dongar Case : संभाजीनगरातील खवड्या डोंगराचं रहस्य काय? ‘खवड्या’ असं नाव का पडलं? वाचून धक्काच बसेल!
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभा...
Continue reading
नागपूर पदवीधर निवडणुकीसाठी भाजपची मोठी फिल्डिंग; रविंद्र चव्हाणांचा 2 दिवसांचा विदर्भ दौरा
नागपूर | प्रतिनिधी
नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या आगामी निवडणु...
Continue reading
‘महाखनिज-2’ पोर्टलवरून राज्यभर 24 तास नजर; IAS रूबल अग्रवाल यांच्याकडे मोठी जबाबदारीअवैध गौण खनिज उत्खननाला आळा घालण्यासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; डिजिटल ट्रॅकिंग, हायटेक क...
Continue reading
विंचू दंश : चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. घरात खुंटीवर टांगलेल्या पँटमध्ये लपलेल्या विंच...
Continue reading
मुनगंटीवार म्हणाले- ‘जिल्ह्याचं कल्याण त्यांनीच ठरवलंय’ : राज्यातील सत्ताधारी भाजपमध्ये सर्व काही सुरळीत असल्याचे चित्र सातत्याने मांडले जात असले, तरी चंद्रपूर जिल्ह्यातील अंतर्गत ...
Continue reading
Viral Video: ताडोबातील 3 वाघांच्या बछड्यांची जलक्रीडा; नैसर्गिक स्विमिंग पूलमध्ये धम्माल करतानाचा मनमोहक Video Viral
चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी...
Continue reading
विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल आक्रमक : राज्य सरकारच्या महसूल विभागाची फसवणूक करून बेकायदा गौण खनिज उत्खनन करणाऱ्यांवर आता मोठी कारवाई होणार असल्याचे...
Continue reading
मोठा दिलासा! विदर्भातील शाळा तब्बल 7 दिवस उशीरा सुरू; शिक्षण विभागाचा महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक निर्णय
विदर्भातील वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर रा...
Continue reading
चंद्रपूर हादरवणारं प्रकरण: पैशांच्या हव्यासापोटी आईचाच अमानुष कारनामा उघड
चंद्रपूर जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि माणुसकीला काळिमा फासणारं प्रकर...
Continue reading
जळगाव जामोद परिसरात वनविभागाची धडक कारवाई; 4.79 लाखांचा अवैध लाकूडसाठा जप्त
जळगाव जामोद ते संग्रामपूर मार्गावरील चांगोफ...
Continue reading
नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यात महसूल विभागाने केलेल्या एका धाडसी कारवाईची सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा रंगली आहे. सिनेमातील एखाद्या अॅक्श...
Continue reading
मल्लेश नरसय्या मेरफुलवार, रा. हांबा जेसीबी (पिवळी) – क्र. MIH-33/4487 , ट्रॅक्टर महिंद्रा B275DI (लाल) – क्र. M134/BV-5332,दोन्ही वाहने मातीने भरलेली,सिंदूबाई किसनदेव बोदलकर, रा. उपरी ट्रॅक्टर स्वराज 843XM (निळा), ट्रॉली (लाल) ,राजेश नामदेव सात्पुते, रा. उपरीट्रॅक्टर स्वराज 735FF (निळा-पांढरा)
सर्वही वाहने सावली वनपरिक्षेत्र कार्यालयात जप्त करून ठेवण्यात आली आहेत.या मोहिमेत वनरक्षक सतिश नागोसे, रमेश बोनलवार, सतिश मजोके, बंडू दुधे, रवि सोनुले, मारोती पिपरे, नेहरू पाल आणि पीआरटी चमू यांनी मोलाचे सहकार्य केले.ही संपूर्ण कारवाई विभागीय वन अधिकारी राजन तलमले आणि सहायक वनसंरक्षक विकास तरसे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद धुर्वे पुढील तपास करीत आहेत.सावली परिसरातील अवैध उत्खननाविरोधात वनविभागाची ही धडक कारवाई नागरिकांत कौतुकास्पद ठरली आहे.
read also : https://ajinkyabharat.com/beer-rum-fail-india-shocked-to-see-whiskey-smoke-figures/