वंचित बहुजन आघाडीची नियोजन बैठक; वाहतूक–निवास ते संचलनापर्यंत सर्व तयारी पूर्ण

वंचित बहुजन आघाडी

मुंबईत येत्या 25 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या भव्य ‘संविधान सन्मान महासभा’साठी अकोट तालुका सज्ज झाला आहे. वंचित बहुजन आघाडीच्या तालुका स्तरावरील महत्त्वपूर्ण बैठकीत शेकडो कार्यकर्त्यांना महासभेत सहभागी करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. अकोट तालुक्यातून यंदाची उपस्थिती ही विक्रमी व शिस्तबद्ध असेल, असा ठाम विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

बैठकीत महासभेपूर्वी आणि नंतरच्या संपूर्ण नियोजनाचा आढावा घेण्यात आला. तालुक्यातील सर्व कार्यकर्ते 24 नोव्हेंबर रोजी सायंकाळी मुंबईकडे प्रस्थान करणार असून, यासाठी वाहतूक व्यवस्था, निवास, भोजन, बॅनर–पोस्टर आणि संचलनाची रचना याबाबत तपशीलवार चर्चा झाली. कार्यकर्त्यांना वेळापत्रक, मार्गदर्शन आणि जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या.

संविधानाच्या संरक्षणासाठी व सामाजिक न्यायासाठी लढणाऱ्या वंचित बहुजन आघाडीने अकोट तालुक्यातील प्रत्येक कार्यकर्त्यांपर्यंत महासभेचे महत्त्व पोहोचवले असून, गावोगावी संपर्क मोहीम सुरू आहे. “संविधानावरील वाढते आघात रोखण्यासाठी व्यापक एकजूट आवश्यक आहे. अकोट तालुका यात आघाडीवर राहणार,” असे पदाधिकाऱ्यांनी बैठकीत सांगितले.

Related News

या बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे तालुका पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते आणि विविध गावांतील प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महासभेला अकोट तालुक्यातून जाणारे शेकडो कार्यकर्ते हा या आंदोलनाचा महत्त्वाचा आवाज ठरणार असल्याचे बैठकीत नमूद करण्यात आले.

read also : https://ajinkyabharat.com/cricket-queen-smriti-mandhana-haldi-ceremony-unforgettable-photo-goes-viral-9-special-moments/

Related News