बाळापूरमध्ये भव्य पक्षप्रवेश सोहळा; असंख्य कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस (अप)मध्ये प्रवेश

बाळापूर

 बाळापुर : 15 नोव्हेंबर 2025 रोजी बाळापूर शहरात बाळापुर नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर भव्य पक्षप्रवेश सोहळा पार पडला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली हा सोहळा आयोजित करण्यात आला. कार्यक्रमात महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, अकोला जिल्हा निरीक्षक व आमदार विधान परिषद संजय खोडके, आमदार विधान परिषद अमोल मिटकरी, जिल्हाध्यक्ष मोहम्मद बद्री जमा, महिला जिल्हाध्यक्ष प्रतिभाताई अवचार, ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष हरिभाऊ वाघोळे, मूर्तिजापूर निरीक्षक उजवणे सर, शेळके सर, किसान सभा जिल्हाध्यक्ष अरविंद पाटील, कामगार जिल्हाध्यक्ष शुभमभाऊ तिडके, बाळापुर तालुका अध्यक्ष प्रशांत मानकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने पक्षप्रवेश केला. यामध्ये शेख फजल मोहम्मद, मुक्त लीब मोहम्मद, साजिद मोहम्मद, रजा शेख, सदनाम शेख, समीर शेख, नुमान शेख, मनीष तायडे, मोहम्मद सिद्दिकी, मोहम्मद इकबाल, अहमद फरान, मोहम्मद असीम, मोहम्मद रहमान, शेख राफ, तुषार साबळे, गणेश गवई, हर्ष तायडे, कुनाल डोंगरे यांसह इतर कार्यकर्त्यांचा समावेश होता.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका अध्यक्ष प्रशांत मानकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन शुभम तिडके यांनी केले.

Related News

read also :  https://ajinkyabharat.com/balapur-municipal-council-election-nominations-started-on-16th/

Related News