महा ई सेवा संघटनेच्या बंदला बाळापूरमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

महा ई सेवा

बाळापूर – महाराष्ट्र राज्यातील महा ई सेवा संघटनेच्या विविध मागण्यांसाठी करण्यात आलेल्या बंदला बाळापूरमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तहसीलदारांना संघटनेच्या मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

संपूर्ण राज्यात केंद्र चालकांनी विविध मागण्यांसाठी केंद्र बंदचे आवाहन केले होते, त्यानुसार बाळापूर तालुक्यातही बंद यशस्वी ठरला.

बंद यशस्वी होण्यासाठी राज्य प्रतिनिधी अनिल गिऱ्हे, जिल्हा अध्यक्ष मनीष तिवारी, तालुका अध्यक्ष दिगंबर उगले, दिलीप पातोडे, प्रतिभाताई पंच भाई, गजानन ठोंबरे, पंकज इंगळे, महेश जाधव, मनोज तायडे, तोहसिफ भाई, पल्हडे वाडेगगा, प्रफुल ढगे, अंकित जढाळ आणि इतर सर्व सेतू संचालक यांनी खूप मेहनत घेतली.

Related News

बाळापूरमधील नागरिकांनीही बंदाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत संघटनेच्या मागण्यांना पाठिंबा दर्शविला.

read also : https://ajinkyabharat.com/sir-c-v-raman-walking-science-demonstration-inaugurated-in-murtijapur-high-school/

Related News