खदान पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या जुने खेतान नगर परिसरातील रहिवाशी सागर
पंडितराव देशमुख यांच्या राहत्या बंद घराला लक्ष करून अज्ञात चोरट्यांनी अंदाजे
Related News
अल्पवयीन मुलीला प्रेम जाळ्यात अडकवून अत्याचार व मारहाण करणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल!
आमदार अमोल मिटकरी त्यांच्या निवासस्थानी शिवराज्याभिषेक सोहळा साजरा
बाळापूरमधील तीन रहिवाशांचा मृत्यू.
ज्वारी काढणीच्या कामात नागाचा साक्षात्कार
बोरगाव मंजू येथे गोवंशाला जीवनदान.
उन्हाळी क्रिकेट शिबिराचा समारोप.
“इंग्लंडचा रणसंग्राम! पहिल्याच दिवशी 498 धावा,
श्री परशूराम जयंती साजरी करण्यासाठी अकोला शहरात भव्य शोभायात्रा आयोजित.
शिवसेना (ठाकरे गट) चे जिल्हाप्रमुख गोपाल दातकर अर्ज फेटाळला
छत्रपती संभाजीनगरमध्ये भरधाव कारची धडक;
बीअरच्या बाटलीने ३६ वार:
जिल्हा परिषद अकोला : अधिकारी–कर्मचारी, जनतेत तीव्र नाराजी
एक लाख रुपये किमतीचा ऐवज लंपास केला. या चोरीच्या घटनेमुळे परिसरात एकच
खळबळ उडाली. प्राप्त माहितीनुसार ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली
असून घटनेची माहिती मिळताच खदान पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक किनगे,
एलसीबी पोलीस निरीक्षक शंकर शेळके, उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी ,
आपल्या पथकासह घटनास्थळी पोचले होते. यावेळी फॉरेन्सिक पथक, डॉग युनिट पथक, फिंगरप्रिंट एक्सपर्ट,
घटनास्थळी पोहोचले. दुचाकी वरून आलेला चोरट्यांनी दाराचा कुलूप कोंडा तोडून घरात
प्रवेश केला, यावेळी चोरट्यांनी एक फोटो कॅमेरा अंदाजे किंमत 65 हजार रुपये, अलमारी
मधील तीस हजार रुपये नगदी, व सोने असा अंदाजे एक लाखाचा मुद्देमाल लंपास केला.
देशमुख परिवार हे देवदर्शनासाठी पुण्याला 15 मे रोजी गेले होते.
रविवारी रात्री घरी परत आले असता त्यांना घरात चोरीची घटना झाल्याचे निदर्शनासह आले.
त्यानंतर त्यांनी याची माहिती खदान पोलिसांना दिली.
याप्रकरणी सागर देशमुख यांनी खदान पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली
असून पुढील तपास खदान पोलीस करीत आहे..
Read Also
https://ajinkyabharat.com/akola-hyderabad-national-highway-accident-session-schedule/