जितापूरमध्ये वाघाचा कहर! सलग तिसऱ्या हल्ल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे सावट, वन विभागावर रोष
जितापूर परिसरात पुन्हा एकदा वाघाच्या हल्ल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दिनांक २६ ऑक्टोबर रोजी सकाळच्या दरम्यान वाघाने शेतकरी गजानन मंगळे यांच्या गाईवर हल्ला करून तिची शिकार केली. या हल्ल्यात गाईचा जागीच मृत्यू झाला असून, परिसरात पुन्हा एकदा भीतीचे सावट पसरले आहे.
विशेष म्हणजे, ही सलग तिसरी घटना असून याआधीही वसुबारसच्या दिवशी मंगळे यांच्या घराशेजारील गोठ्यातून वाघाने शिकार केली होती. या सततच्या हल्ल्यांमुळे जितापूर, शेलगाव, आणि जवळील खेड्यांतील शेतकऱ्यांमध्ये तीव्र दहशत निर्माण झाली आहे.
Related News
दमाहे कुटुंबावर दुःखाचा डोंगर : महाराष्ट्रात रस्ते अपघातांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे. दररोज कुठे ना कुठे घडणाऱ्या अपघातांमुळे अनेक कुटुंबांचे आयुष्य ...
Continue reading
फरार आरोपींच्या अटकेसाठी एसडीपीओ कार्यालयावर महिलांचा मोर्चा; ‘15 दिवस उलटले तरी आरोपी मोकाट’, न्यायासाठी आक्रमक एल्गार
अलंकार मार्केट परिसरात घडलेल्...
Continue reading
मान्सूनपूर्व पावसाने उमरा परिसरातील केळी उत्पादक हवालदिल; तातडीच्या मदतीची मागणी
मान्सूनच्या आगमनापूर्वीच झालेल्या अवकाळी पावसाने आणि वादळी वाऱ्य...
Continue reading
30 दिवसांत पूर्णा घाटाचा कायापालट! जिल्हाधिकारी वर्षा मीना यांचे कडक निर्देश; कावड उत्सवापूर्वी मोठ्या सुविधांची उभारणी
30 दिवसांत पूर...
Continue reading
बाळापूर तालुक्यात वादळी वाऱ्याचे थैमान; घरांची पडझड, जनावरे जखमी
बाळापूर तालुक्यात वादळी वाऱ्याचा भीषण तडाखा; घरांवरील टीनपत्रे उडाली, जनावरे जखमी, अन...
Continue reading
अकोला MIDC मध्ये मध्यरात्री थरार! 3 गुंडांचा धक्कादायक हैदोस; चाकूचा धाक दाखवत चालकाकडून हजारो रुपयांची लूट
अकोला शहरातील औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाच्या म...
Continue reading
लाडकी बहीण योजनेतून 81 लाख महिलांची नावे वगळली? रोहित पवारांचा धक्कादायक दावा; योजना बंद करण्याचा मोठा डाव?
मुंबई : राज्यातील सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या मुख्यमंत्री माझी
Continue reading
लाखपुरीत धक्कादायक घटना! दोन दुचाक्या जळून खाक; लाखोंचे नुकसान, दोषींवर कारवाईची मागणी
मूर्तिजापूर तालुक्यातील लाखपुरी गावात रविवारी दुपारच्या सुमारास...
Continue reading
अकोल्यात आयजीपी महेश पाटील यांचा दमदार दौरा! गुन्हेगारी नियंत्रणासाठी दिले महत्त्वाचे निर्देश
अमरावती विभागाचे नवनियुक्त विशेष पोलीस महानिरीक्षक (आयजीपी)
Continue reading
सावरगाव ग्रामसभेत 10 गंभीर मुद्द्यांवर प्रचंड संताप; अपंग निधी, 15 वा वित्त आयोग आणि घरकुलावरून गोंधळ
अकोट तालुक्यातील सावरगाव येथे आयोजित करण्यात आल...
Continue reading
गावातील नागरिकांनी सांगितले की, आता लहान मुलांना घराबाहेर न सोडण्याचा इशारा पालकांनी दिला आहे. संध्याकाळीच गावात संचारबंदीचे वातावरण असून, शेतात काम करतानाही शेतकरी भयभीत आहेत.
दरम्यान, गावकऱ्यांचा वन विभागावर तीव्र रोष आहे. “कागदी पंचनामे आणि नुकसानभरपाईच्या नावाखाली वन विभाग फक्त भोपळा देतोय,” असा आरोप संतप्त ग्रामस्थ करत आहेत. त्यांनी त्वरित वाघाचा बंदोबस्त करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे.
ग्रामस्थांनी चेतावणी दिली आहे की, जर वन विभागाने योग्य ती कार्यवाही केली नाही तर गाव बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात येईल.
read also : https://ajinkyabharat.com/vijecha-dhak-basun-kamgarcha-death-2-lahan-mulinwar-aichi-responsibility/