नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाने उद्योगपती अदानी आणि अंबानी यांच्याकडून मोठ्या प्रमाणात काळा पैसा गोळा केला असून हे पैसे घेतल्यानंतर काँग्रेसने त्यांच्यावर टीका करणे बंद केले आहे, असा गंभीर आरोप करून लोकसभा निवडणुकीचा प्रचार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्याच दिशेला नेला. कधीही अदानी-अंबानीवर न बोलणाऱ्या मोदींनी थेट प्रचारसभेत या उद्योगपतींची नावे घेऊन सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. दरम्यान, मोदींच्या याच आरोपांना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अतिशय जोरकसपणे उत्तर दिले.
नमस्कार मोदीजी, थोडेसे घाबरला आहात का? एरवी आपण अदानी-अंबानींच्या गोष्टी बंद खोलीत करता. आज पहिल्यांदाच जाहीररित्या आपण अदानी-अंबानींचे नाव घेतले. ते टेम्पोमधून पैसे देतात, हे तुम्हाला कसे माहितीये? तुमचा हा वैयक्तिक अनुभव आहे का? असा चिमटा काढत राहुल गांधी यांनी मोदींना डिवचले.
तसेच सीबीआय आणि ईडीला अदानी आणि अंबानींकडे पाठवून न घाबरता त्यांची संपूर्ण चौकशी करा, असे आव्हानही राहुल गांधी यांनी मोदींना दिले. राहुल गांधी पुढे बोलताना म्हणाले, “मी देशाला सांगू इच्छितो नरेंद्र मोदींनी जेवढा पैसा या दोघांना दिलाय तेवढाच पैसा आम्ही भारतातल्या गरीब लोकांना देणार आहोत. महालक्ष्मी योजना, पहिली नोकरी पक्की योजना या आणि अशा योजनांच्या माध्यमातून करोडो लोकांना आम्ही लखपती बनवू, असे देशातील तमाम लोकांना सांगू इच्छितो…”
Related News
पूजा, फोटो आणि शेवटचा मदतीचा कॉल: मृत डॉक्टरच्या फोनमधून उघड झाले धक्कादायक तपशील
साताऱ्यातील २८ वर्षीय महिला डॉक्टरच्या मृत्यू प्रकरणाची धक्कादायक माह...
Continue reading
CIA Plot to Kill Prime Minister Modi : भारत-रशियाच्या गुप्तहेरांनी डावलला धक्कादायक कट
CIA plot to kill Prime Minister Mo...
Continue reading
महापालिका निवडणुकीनंतर त्यांचा पक्ष? — संजय राऊतांचा शिंदे गटाबद्दल मोठा गौप्यस्फोट आणि त्याचे अर्थ
मुंबई — शिवसेना (उद्धव भाग)चे खासदार आणि भाष्यकार संजय
Continue reading
ट्रम्पचा भारताला इशारा: "रशियन तेल थांबवा, नाहीतर भरावे लागतील प्रचंड शुल्क"
भारताने दाव्याचे फेटाळले समर्थन; तरीही रशियन तेल आयात २० टक्क्यांनी वा...
Continue reading
बाळापूर: तालुक्यातील वाडेगाव येथील कृषी उत्पन्न उप बाजार समितीत अनेक सुविधा नसल्यामुळे शेतकरी गंभीर त्रासात आहेत. या...
Continue reading
सोलापूरमध्ये भाजप प्रवेश: राजकीय वातावरण आणि ऑपरेशन लोटस
सोलापूरमध्ये भाजप प्रवेश जोरात सुरू आहे. माजी आमदार दीपक साळुंखे यांचा समावे...
Continue reading
काँग्रेसच्या विरोधी पक्षनेते आणि खासदार राहुल गांधी यांना एका टीव्ही चॅनलवरील चर्चेत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यावर काँग्रेसने गंभीर दखल घेतली असून केंद्रीय गृहमंत्री अम...
Continue reading
आर्णी तालुक्यात प्रशासकीय संवेदनहीनतेचा कळस; मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपलीपूरग्रस्त शेतकर्यांना वार्यावर सोडून तीन मंडळ अधिकारी, 11तलाठी सहलीवर!तहसीलदारांचीही द...
Continue reading
मोदींचा ७५ वा वाढदिवस : अमित शाह ते देवेंद्र फडणवीस – मोदींबरोबरच्या आठवणीमधील भावनिक किस्से
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (१७ सप्टेंबर २०२५) आपला ७५ वा वाढदिवस साजरा करत आहेत. या महत...
Continue reading
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आदमपूर येथील हवाई तळावर जाऊन
भारतीय जवानांना उद्देशून ठाम आणि प्रेरणादायी संदेश दिला. या कारवाईनंतर पंतप्रधानांनी थेट सीमेवर
क...
Continue reading
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भारताचे
नाव घेत पाकिस्तानच्या जनतेला एक वचन दिले आहे.
ज्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात
Continue reading
अण्णा हजारे यांनी जी मागणी केली आहे त्याबद्दल आपले सरकार
ऐकून घेतील आणि त्यावर निर्णय करतील,
असे स्पष्टीकरण चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.
बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष...
Continue reading
राहुल गांधी यांचा व्हिडीओतून मोदींवर हल्लाबोल
नमस्कार मोदीजी, थोडेसे घाबरला आहात का? एरवी आपण अदानी-अंबानींच्या गोष्टी बंद खोलीत करता. आज पहिल्यांदाच जाहीररित्या आपण अदानी-अंबानींचे नाव घेतले. ते टेम्पोमधून पैसे देतात, हे तुम्हाला कसे माहिती? हा तुमचा वैयक्तिक अनुभव आहे का? मी देशाला सांगू इच्छितो नरेंद्र मोदींनी जेवढा पैसा या दोघांना दिलाय तेवढाच पैसा आम्ही भारतातल्या गरीब लोकांना देणार आहोत.
अदानी-अंबानी आणि राहुल गांधी यांच्यात अशी कोणती डील झाली? मोदींचा सवाल
मागील पाच वर्ष काँग्रेसचे राजकुमार अदानी आणि अंबानी यांच्यावर आरोप करत होते. मात्र निवडणूक जाहीर होताच अचानक त्यांनी अदानी अंबानींवर बोलणे बंद केले. दोन्ही उद्योगपतींकडून त्यांना किती बॅगा भरून काळा पैसा मिळाला? अदानी-अंबानी आणि राहुल गांधी यांच्यात अशी कोणती डील झाली? ज्यामुळे आता एका रात्रीत राहुल गांधी यांचा दृष्टीकोन बदलला, असा सवाल करून मोदींनी राहुल यांच्यावर टीका केली.