49 पोते सोयाबीन जप्त, दोन आरोपी अटक

पोलिसांनी तत्काळ पकडली धक्कादायक साखळी.

अकोला MIDC परिसरात धक्कादायक चोरीची घटना समोर आली आहे. येथे एका गोडाऊनचे ताले फोडून 49 पोते सोयाबीन चोरीला गेले, ज्याची किंमत तब्बल ₹1.31 लाख इतकी आहे.या प्रकरणाची गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई केली. एमआयडीसी पोलीसांच्या विशेष चमूने दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून संपूर्ण मालही जप्त करण्यात आला असून चोरीचा प्रकार उघडकीस आला आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कारवाईमुळे व्यापारी वर्गाला दिलासा मिळाला असून, पोलिसांची तत्परता आणि योग्य गुप्त माहितीच्या आधारे ही चोरी लवकर उघडकीस आली आहे.या घटनेने अकोला एमआयडीसी परिसरातील सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांची तत्परता दाखवली आहे.

read also:https://ajinkyabharat.com/aajoba-aani-kakanwar-banana-mathal/