नाशिक: लोकसभा निवडणुकूची घोषणा झाल्यापासूनच नाशकात रोज नवीन राजकीय नाट्य पाहायला मिळत आहे. आता माजी महापौर दशरथ पाटील यांनी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेत विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. तर, दुसरीकडे विजय करंजकर यांनी बंडखोरीचे संकेत देत ठाकरे गटाला धक्का दिला आहे.
नाशिक लोकसभा मतदार संघातून ठाकरे गटाचे विजय किसन करंजकर (अपक्ष) यांच्या वतीने रोहिदास किसन करंजकर यांनी निवडणूक निर्णय अधिकारी जलज शर्मा यांच्या कडे नामनिर्देशनपत्र दाखल केले. त्यामुळे नाशकात ठाकरे गटाला बंडखोरीचे ग्रहण लागल्याचं चित्र आहे.
विजय करंजकर यांचे बंडखोरीचे संकेत
त्यासाठी अपक्ष उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले आहेत. माझ्यावर बंडखोरीची वेळ का आली याचा शिवसेनेने विचार करावा. मला एक वर्षांपूर्वी तयारी सुरु करायला सांगितली होती. एनवेळी उमेदवारी नाकारली. माझ्यासोबत ३५ नगरसेवक आणि जिल्हा परिषदेचे चार सदस्य येथे उपस्थित आहे.
Related News
ज्ञानेश कुमार यांना भारतरत्न द्या; संजय राऊतांचा भाजपवर खोचक टोला
पश्चिम बंगाल निवडणुका आणि मतदार यादीच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले; भाजपच्या पद्मभूषण मागणीवर राऊतांचा उप...
Continue reading
ज्ञानेश कुमार यांचा ‘खापर पणजोबा’ कुठून आला? फॉर्म-६च्या वादावर संजय राऊत आक्रमक; महाभियोग आणण्याची घोषणा निवडणूक आयोगातील कथित अंतर्गत मतभेद आणि मतदार यादीच्या व...
Continue reading
8 महिन्यांची चिमुकली मध्यरात्री अंथरुणातून बेपत्ता; नाशिकमध्ये खळबळ, अपहरणाचा गुन्हा दाखल
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आई-वडिलांसो...
Continue reading
हारलेल्या जागांवर भाजपचा गेम प्लान! तावडे, बी.एल. संतोष आणि नितीन नवीन यांच्यावर मोठी जबाबदारी
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक 2027 साठी भाजपची आतापासूनच तयारी; पश्चिम यूपी, अवध आणि...
Continue reading
अभिजीत दिपकेंची CJP निवडणुकीच्या मैदानात उतरणार? अखिलेश यादवांसोबतच्या भेटीनंतर राजकीय चर्चांना उधाण
NEET पेपरफुटीच्या मुद्द्यावरून देशभरात आंदोलन उभं करणाऱ्या **कॉकरोच जनता पार्ट...
Continue reading
समृद्धी महामार्गावर चोरट्यांचा धुमाकूळ; टायर फोडून लुटमार, दगडफेक अन् हवेत गोळीबार, तब्बल १८ लाखांचा ऐवज लंपास
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्...
Continue reading
CM फडणवीसांच्या कार्यक्रमात रिकाम्या खुर्च्या; व्हिडिओ शेअर करत संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांना टोला
आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात विकासकामांना वेग आला असून, या का...
Continue reading
शेतीचा उत्पादन खर्च 25 ते 30 टक्क्यांनी कमी होऊ शकतो; मुख्यमंत्री फडणवीसांचा शेतकऱ्यांना AI आणि तंत्रज्ञानाच्या वापराचा सल्ला
शेती क्षेत्रासमोरील वाढता उत्पादन खर्च, अल्पभूधारक श...
Continue reading
नाशिकमध्ये व्यावसायिकाला दोन कोटींच्या खंडणीची धमकी; ‘लॉरेन्स बिश्नोई गँग’च्या नावाने मेसेज
नाशिक : नाशिक शहरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहरातील एका स्पोर्ट्स साहित्य व...
Continue reading
Prithviraj Chavan : भाजपला बाजूला ठेवून 2014 मध्येच सरकार स्थापनेचा प्रस्ताव; पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक गौप्यस्फोट
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडवणारा दावा ...
Continue reading
तृणमूलचा भाजपला मोठा धक्का; ममता बॅनर्जींचं जोरदार कमबॅक, विधानसभा निवडणुकीनंतर दोनच महिन्यांत पुन्हा फिरलं वारं
पश्चिम बंगालच्या राजकारणात विधानसभा निवडणुकीनंतर अवघ्या दोन महिन्य...
Continue reading
केंद्रीय मंत्रिमंडळात मोठा फेरबदल? शिंदेंना आणखी एक मंत्रिपद मिळणार; धर्मेंद्र प्रधानांचीही पुन्हा एन्ट्री होण्याची शक्यता
केंद्रातील राजकीय वर्तुळातून सध्या मोठी बातमी समोर येत आ...
Continue reading
दोन दिवसांत कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन पुढील निर्णय घेणार, असं म्हणत विजय करंजकर यांनी बंडखोरीचे संकेत दिले.
नाशिक लोकसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे माजी जिल्हाप्रमुख यांना उमेदवारी न दिल्यामुळे ते नाराज होते. ठाकरे गटाकडून राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी दिल्यामुळे विजय करंजकर हे बंडखोरी करतील अशी शक्यता वर्तवली जात होती.
मात्र आज अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असताना विजय करंजकर यांनी अखेर आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विजय करंजकर यांच्या उमेदवारीमुळे आता महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या अडचणी वाढणार आहे.