पोपटखेड जिल्हा परिषद शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

पोपटखेड जिल्हा परिषद शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

अकोट तालुका प्रतिनिधी | 21 जून 2025

अकोट तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या पोपटखेड ग्रामातील जिल्हा परिषद

वरिष्ठ प्राथमिक मराठी शाळेत आज आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

Related News

सकाळी ६.५० ते ७.५० या वेळेत निसर्गरम्य वातावरणात विद्यार्थ्यांनी विविध योगासने

व प्राणायामाचे प्रात्यक्षिक सादर केले. योगाचे आरोग्यदायी फायदे आणि

जीवनातील महत्त्व याबाबत माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांचा सहभाग उल्लेखनीय होता.

या कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक संजय साळुंके, प्रशांत धाबे, मंगला लाजूरकर, महेन्द्र काकड,

प्रमोद पिंप्राळे यांच्यासह गावातील प्रमुख नागरिक उपस्थित होते.

योग दिनाच्या आयोजनासाठी शिक्षकवृंदांनी विशेष परिश्रम घेतले.

Read Also : https://ajinkyabharat.com/st-pales-akadmeet-international-yoga-day/

Related News