हॉर्न वाजवण्यावरून वाद विकोपाला; चाकू हल्ल्यात एकाचा मृत्यू

हॉर्न वाजवण्यावरून वाद विकोपाला; चाकू हल्ल्यात एकाचा मृत्यू

हॉर्न वाजवण्यावरून दोन व्यक्तींमध्ये वाद होऊन चाकूहल्ला झाल्याची घटना रात्री अकोल्यातील

अकोट फाइल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मस्तान चौकात घडली. या हल्ल्यात एक जण ठार झाला

असल्याची माहिती आहे. एका दुचाकीस्वाराने जोरात हॉर्न वाजवल्यामुळे

Related News

दुसऱ्या व्यक्तीसोबत वाद झाला. क्षुल्लक कारणावरून सुरू झालेला वाद क्षणात शिवीगाळीत

व चाकूहल्ल्यात परिवर्तित झाला. हा प्रकार अचानक घडला की आजूबाजूचे नागरिक तातडीने घटनास्थळी जमा झाले.

जखमीला तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्याने

त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती आहे. या प्रकरणी रात्री

उशिरापर्यंत अकोट फाइल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Read Also : https://ajinkyabharat.com/lachkhoricha-bhandafod-paturche-naib-tehsildar-lach-ghatana-akoliath-attake/

Related News