पिंजर / प्रतिनिधी
भेंडीमहाल ते पिंजर या गावाच्या रस्त्याची गेल्या काही दिवसापासून दुरुस्ती न झाल्याने दुरावस्था झाली आहे.
रस्त्यावरील खड्ड्यामुळे हा रस्ता जीवघेणा ठरत आहे. परिणामी या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनांना अडथळा
Related News
बिग बॉस मराठी ६ : विशालचा खेळ बदलला, रेवाची एंट्री आणि रुचितासोबत तणावाची स्थिती
“मी तिला पटवणार” – विशालच्या रणनीतीमुळे घरात वाढले नातेवाईकांच्या गोंधळाचे सावट
कलर्स मराठीनं नुक...
Continue reading
संरक्षण क्षेत्रातील शेअर्समध्ये तेजी; मध्य पूर्वेतील तणावामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला
सोमवारी भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झाली, मात्र संरक्षण क्...
Continue reading
T20 World Cup 2026: भारताकडून पराभवाने पाकिस्तानला मोठा झटका; खेळाडूंवर ठोठावला 50 लाखांचा दंड
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे कठोर निर्णय – खराब कामगिरीला आता मोठी किंमत
Continue reading
अमेरिका-इस्रायल-इराण संघर्ष: डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा, जगभरात तणाव
अमेरिका आणि इस्रायलकडून इराणवर हल्ले
इस्रायल आणि अमेरिका यांनी ...
Continue reading
होळी 2026: रंगाच्या आनंदात गॅझेट सुरक्षित ठेवण्यासाठी 10 वॉटरप्रूफ गॅझेट्स
होळी म्हणजे आनंद, उत्साह आणि रंगांचा उत्सव
Continue reading
‘The 50’: सिवेत टोमरने वंशज सिंगला मागितली माफी; म्हटले, “तुला दुख झालं असेल, त्याबद्दल खरोखरच माफी”
रिऐलिटी शो The 50 प्रेक्षकांच्या मनावर राज करत आहे...
Continue reading
EPFO अपडेट 2025-26: नोकरदारांसाठी मोठी बातमी! पीएफवर 8.25% व्याजदर कायम
देशातील 7.5 कोटी नोकरदारांसाठी महत्त्वाची घोषणा
Continue reading
अमेरिकेचे तीन एफ-15 फायटर जेट इराणने नाही, तर कुवेतच्या एअर डिफेन्सने चुकून पाडले
अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धात मोठा ट्विस्ट सम...
Continue reading
धक्कादायक! इस्रायलच्या पंतप्रधान कार्यालयावर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला
मध्य-पूर्वेत तणाव उफाळला; अमेरिका-इस्रायल-इराण संघर्ष भयंकर स्वरूपात
मध्य-पूर्वेत पुन्हा एकदा भयंकर तणाव उभ...
Continue reading
इराण-यूएई युद्धामुळे महाराष्ट्रातील खासदार व पर्यटक दुबईत अडकले
युद्धाची पार्श्वभूमी
इराणने दुबईसह आखाती देशांमधील अमेरिकेच्या लष्करी तळांवर हल्ले केल...
Continue reading
निर्माण होत असून अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे, या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी
या भेंडीमहाल परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे, भेंडीमहाल येथून बार्शीटाकळी तालुक्याकडे जाण्यासाठी
भेंडीसूत्र, आणि पिंजर कडे जाण्यासाठी जवळचा मार्ग आहे.
या मार्गावरून वरील सर्व गावातील नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी ये-जा करावी लागते.
मात्र या रस्त्याची फार दुरवस्था झाली आहे, गेल्या अनेक दिवसापासून या मार्गाची दुरुस्ती न केल्यामुळे रस्त्यावर खड्डे पडले आहेत.
या रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी या भेंडीमहाल परिसरातील ग्रामस्थांनी अनेक वेळा संबंधित विभागाकडे केली आहे.
मात्र गावकऱ्यांच्या या मागणीकडे दुर्लक्ष केल्या जात आहे, या रस्त्याची डागडुजी सुद्धा करण्यात आली नाही.
मात्र यामध्ये निष्कृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्याने काही महिन्यातच हा रस्ता पुन्हा जैसे थे झाला आहे.
त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे, पिंजरच्या ठिकाणी एकांदा रुग्ण आणायचा असल्यास मोठी कसरत करावी लागते.
त्यामुळे संबंधित विभागाने या भेंडीमहाल गावातील नागरिकाची रस्त्याची समस्या समजून हा रस्ता तात्काळ दुरुस्त करावा.
अशी मागणी या भेंडीमहाल गावातील नागरीक करीत आहेत.
Read Also :https://ajinkyabharat.com/umbarda-bazar-complex-kapasichya-lagwadila-suruwat/