PM किसान योजनेची २०वी हप्ताची प्रतीक्षा संपणार! २० जूनला येऊ शकतो २००० रुपयांचा हप्ता

PM किसान योजनेची २०वी हप्ताची प्रतीक्षा संपणार! २० जूनला येऊ शकतो २००० रुपयांचा हप्ता

नवी दिल्ली | प्रतिनिधी

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा (PM-KISAN) २०वा हप्ता लवकरच म्हणजे २० जून २०२५ रोजी पात्र

शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही रक्कम २००० रुपये असेल.

Related News

मात्र अद्याप अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही.

 हप्त्याचा लाभ कोणाला?

  • फक्त PM-KISAN पोर्टलवर रजिस्ट्रेशन पूर्ण केलेल्या आणि Farmer ID असलेल्या शेतकऱ्यांनाच हा हप्ता मिळणार.

  • ज्या शेतकऱ्यांनी अद्याप नोंदणी केली नाही, त्यांनी तत्काळ प्रक्रिया पूर्ण करावी.

 ई-केवायसी (e-KYC) अनिवार्य

  • हप्त्यासाठी e-KYC अनिवार्य करण्यात आले आहे.

  • pmkisan.gov.in वर जाऊन “Farmer Corner” मध्ये e-KYC पर्याय निवडता येतो.

  • सीएससी सेंटर (CSC) मध्ये जाऊन बायोमेट्रिक केवायसी देखील करता येते.

 पारदर्शकतेसाठी ‘सॅच्युरेशन ड्राइव्ह’

  • बनावट लाभार्थ्यांना योजनेतून बाहेर काढण्यासाठी सरकारकडून सॅच्युरेशन ड्राइव्ह राबवला जात आहे.

  • यूपी, एमपी, महाराष्ट्र आणि राजस्थानमधील लाखो शेतकऱ्यांनी अद्याप नोंदणी केलेली नाही.

हप्ता मिळवायचा असल्यास शेतकऱ्यांनी रजिस्ट्रेशन आणि e-KYC त्वरित पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे!

Read Also :  https://ajinkyabharat.com/pravashi-vehicle/

Related News