दानापूर (प्रतिनिधी):
पंधरा ते वीस दिवसांपूर्वी दानापूर परिसरात आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने आणि गारपिटींनी
शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले.
Related News
घरी बनवा नैसर्गिक नाईट क्रीम – चेहरा राहील ताजेतवाने आणि चमकदार
घरी बनवा नैसर्गिक नाईट क्रीम : आजच्या धावपळीच्या जीवनात आपली त्...
Continue reading
नारळ पाणी की ऊसाचा रस: उन्हाळ्यात शरीरासाठी कोणते पेय अधिक फायदेशीर?
उन्हाळा म्हणजे थोडी जास्त तापमानामुळे शरीराला हायड्रेट ठेवण्याची काळजी घेण्याची ...
Continue reading
श्रीगोंदा तालुक्यात भीषण अपघात; पातुर तालुक्यातील एकाच कुटुंबातील तिघांसह चौघांचा जागीच मृत्यू
विठ्ठल महल्ले, अकोला : श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव श...
Continue reading
महागाई मोजण्याचा नवा फॉर्म्युला: अन्नावर कमी, डिजिटल सेवांवर जास्त खर्च
भारतातील किरकोळ महागाईचे गणित आता पूर्णपणे बदलले आहे. आर्थिक नियामकांनी जानेव...
Continue reading
मुंबई महापालिकेचा ८० हजार कोटींचा अर्थसंकल्प उद्या सादर; या विभागांना भरीव निधी मिळण्याची शक्यता
आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळखली जाणारी
Continue reading
IPL 2026: शेड्यूलवर मोठा अपडेट, BCCI ने घ्यायचा निर्णय; संपूर्ण क्रिकेटविश्व राहणार हैराण
क्रिकेटप्रेमींना मोठा धक्का देणारी बातमी आली आहे. आगामी IPL 202...
Continue reading
ओला इलेक्ट्रिकचा शेअर 157 रुपयांवरून 29 रुपयांवर घसरला; कमकुवत आर्थिक निकालांचे मोठे परिणाम
ओला इलेक्ट्रिकच्या शेअर्सने पुन्हा एकद...
Continue reading
मोठा निर्णय: केरळ राज्याचे नाव आता “केरळम”
केंद्र सरकारने देशातील एका महत्त्वाच्या राज्याचे नाव बदलण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. ही बातमी ऐकून देशभरातील नागरिकांमध्ये उत्सुकता न...
Continue reading
आजचा सोन्याचा दर: गेल्या 24 तासांत मोठी वाढ, 10 ग्रॅम सोने पोहोचले 1,64,388 रुपये
सोन्याचे दर गेल्या काही काळापासून सतत वाढत आहेत आणि गेल्या 24 तासांत ...
Continue reading
तुमचे शरीर “सामान्य” असले तरीही अस्वस्थ वाटत आहे? डॉक्टरच्या मते शरीराला रीसेंटची गरज दर्शवणारी 10 चिन्हे
कधी तुम्ही डॉक्टरकडे गेला आणि सर्व तपासण्या “साम...
Continue reading
हिना खानने इफ्तारसाठी बनवले पारंपरिक फिरणी, चाहत्यांना दिला स्वादिष्ट अनुभव
हिना खान ही अभिनेत्री फक्त अभिनय कौशल्यासाठीच नाही, तर तिच्या पाककौशल्यास...
Continue reading
लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी; जानेवारीचा हप्ता लवकरच जमा होणार – आदिती तटकरे
लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी : महाराष्ट्रातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. राज्य ...
Continue reading
यामध्ये दानापूर येथील शेतकरी निखिल रामराव मिसाळ यांचे प्रचंड नुकसान झाले असून त्यांच्या
सर्वे नं. ३६३ मधील एक हेक्टर ६२ आर क्षेत्रातील केळीचे घड व झाडे पूर्णपणे मोडून पडली आहेत.
त्यामुळे शेतकऱ्यांचे अंदाजे पाच ते सहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे, असे त्यांनी सांगितले.
दिनांक १६ मे २०२५ रोजी या नुकसानीची माहिती मिसाळ यांनी व अन्य शेतकऱ्यांनी विमा कंपनीच्या टोल फ्री क्रमांक १४४४७ वर दिली होती.
त्यानंतर स्थानिक पटवारी अंकुश मानकर आणि कृषी सहाय्यक महेश इंगळे यांनी प्रत्यक्ष
पाहणी करून पंचनामा तयार केला व शासनाकडे अहवालही सादर केला.
मात्र, विमा कंपनीने अद्याप कोणतीही दखल घेतलेली नाही. मिसाळ यांच्या मते, त्यांनी दिनांक २६ ऑक्टोबर २०२४ रोजी विमा
कंपनीकडे अधिकृतपणे विमा हप्ता भरलेला असूनही, आजतागायत कंपनीकडून कोणतेही सर्वेक्षण किंवा नुकसानीचे मूल्यांकन झालेले नाही.
वारंवार तक्रार करूनही विमा कंपनीने दुर्लक्ष केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.
“शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारीचा सन्मान करून योग्य ती भरपाई देणे हे विमा कंपनीचे कर्तव्य आहे.
मात्र कंपनीकडून आमच्याकडे केवळ दुर्लक्षच झाले आहे.
ही शेतकऱ्यांसोबतची घोर अन्यायकारक बाब आहे,” असे मिसाळ यांनी सांगितले.
त्यांनी विमा कंपनीला नोटीस देत असा इशारा दिला आहे की,
जर लवकरात लवकर निर्णय घेण्यात आला नाही, तर ही तक्रार ग्राहक मंचासमोर नेण्यात येईल.
Read Also : https://ajinkyabharat.com/chief-officer-dr-bambare-yancha-sanman-kartana-and-bharsaka-and-others/