बीड | 27 जून 2025
माजलगावचे माजी आमदार आर. टी. देशमुख यांचे सोमवारी लातूरजवळील
बेलकुंड येथे वाहन अपघातात दुर्दैवी निधन झाले. ते सोलापूरहून लातूरकडे
Related News
जात असताना त्यांच्या गाडीने उड्डाणपुलावरील पाच लोखंडी
कठडे तोडून चार पलट्या घेत सर्व्हिस रोडवर येऊन अपघात घडवला.
पावसाचे पाणी गाडीच्या काचांवर उडाल्याने चालकाचा अंदाज चुकला
आणि वाहनाचा ताबा सुटला. गाडीचा वेग अधिक असल्याने गाडी चक्काचूर झाली.
अपघातानंतर देशमुख यांना तातडीने रुग्णालयात नेले जात असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेने बीड जिल्ह्यात शोककळा पसरली असून, मंत्री पंकजा मुंडे
यांनी सर्व कार्यक्रम रद्द करत लातूर गाठले आणि देशमुख कुटुंबीयांना धीर दिला.
