नवी दिल्ली | 27 जून 2025
देशात पुन्हा एकदा कोरोना संसर्गाचे प्रमाण झपाट्याने वाढू लागले आहे.
गेल्या काही दिवसांत 1,000 पेक्षा अधिक नवीन रुग्ण आढळून आले असून,
Related News
यामागे दोन नवीन व्हेरिएंट – NB.1.8.1 आणि LF.7 जबाबदार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
हे दोन्ही व्हेरिएंट तमिळनाडू आणि गुजरातमध्ये आढळले असून,
NB.1.8.1 हा ओमिक्रॉन कुटुंबातील JN.1 चा वंशज आहे. LF.7 हा XDV.1.5.1
या रीकॉम्बिनंट व्हेरिएंटचा सब-वेरिएंट आहे. देशाबाहेरही अमेरिकेसह
दक्षिण कोरिया आणि जपानमध्येही याचे रुग्ण सापडले आहेत.
बचावाचे उपाय
वारंवार हात धुणे किंवा सॅनिटायझरचा वापर करा
गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरा, सुरक्षित अंतर पाळा
लक्षणे दिसल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या
लसीकरण पूर्ण करून घ्या
प्रतिकारशक्ती वाढवणारा आहार घ्या
WHO आणि आरोग्य मंत्रालय सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
नागरिकांनी खबरदारी बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/rt-deshmukh-yancha-decreased-dies/
