बुलढाणा, ता. २४ मे : पत्नीसोबत झालेल्या वादानंतर बुलढाणा तालुक्यातील देऊळघाट
येथील एका २८ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. पंकज गणेश काकडे
असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून, तो टाइल्सचे काम करून उदरनिर्वाह करत होता.
ही घटना २३ मे रोजी रात्री ११ वाजता उघडकीस आली.
प्राप्त माहितीनुसार, पंकज व त्याची पत्नी यांच्यात नेहमी वाद होत असत.
२३ मे रोजी कामावरून परतल्यानंतर त्यांच्यात पुन्हा वाद झाला.
वाद विकोपाला गेल्यानंतर दोघांनी बुलढाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात एकमेकांविरोधात तक्रार दाखल केली.
तक्रार दिल्यानंतर पंकज घरी परतला आणि पहिल्या मजल्यावरील घरात दोरीने गळफास घेऊन जीवन संपवलं.
ही बाब रात्री उशिरा घरच्यांच्या लक्षात आली. घटनेची माहिती मिळताच बुलढाणा
ग्रामीण पोलीस ठाण्याचे ठाणेदार गजानन कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून, अधिक तपास सुरू आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/shetkyancha-shetat-janya-yanyacha-rasta-closed-shetichi-mushchar/