15 वर्षांनंतर सर्वात लवकर आगमन

15 वर्षांनंतर सर्वात लवकर आगमन

24 मे रोजी मान्सूनची ‘सरप्राईज एंट्री’

भारतीय हवामान खात्याने जाहीर केल्याप्रमाणे, नैऋत्य मोसमी पावसाने आज

(24 मे) केरळमध्ये 8 दिवस आधीच एंट्री घेतली आहे. यावर्षी मान्सूनचे आगमन 2009

Related News

नंतरचे सर्वात लवकर ठरले आहे. शेतकरी वर्ग आणि सामान्य

नागरिकांसाठी ही बातमी खूपच दिलासादायक आहे.

महत्वाच्या गोष्टी:

  • 2009 नंतर प्रथमच इतक्या लवकर मान्सूनचे आगमन

  • 1 जूनच्या ठराविक तारखेपूर्वी 8 दिवस आधी केरळात एंट्री

  • 1990 मध्ये 19 मे रोजी झालेला सर्वात लवकर मान्सून (इतिहासातील)

 पुढील स्थिती:

  • पुढील 4-5 दिवसांत कोकणात मान्सून दाखल होण्याची शक्यता

  • मुंबईत 1 जूनपर्यंत मान्सून पोहोचणार

  • तळकोकण व गोवा भागात जोरदार पूर्वमान्सून पावसाची हजेरी

 सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस:

  • कणकवली: 130 मिमी

  • वेंगुर्ला: 111 मिमी

  • देवगड: 102 मिमी

  • ऑरेंज अलर्ट जारी, किनारपट्टीसाठी रेड अलर्ट

  • मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा, 3 नंबरचा बावटा फडकावला

 शेतीसाठी शुभ संकेत:

लवकर आलेल्या मान्सूनमुळे खरीप हंगामासाठी मृग नक्षत्रपूर्व मशागत,

बी-बियाण्याची पेरणी, तसेच पाणी टंचाईग्रस्त भागांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

अपडेट्ससाठी जुळले राहा – कारण पावसाची चाहूल म्हणजे नव्या आशा!

Read Also :https://ajinkyabharat.com/mahabij/

Related News